स्वयंपाकासाठी लिंबाचा वापर होतो (Gardening Tips). उन्हाळ्यात लिंबाचा रस, पोहे, मिसळ चटपटीत पदार्थांवर आपण लिंबू पिळून खातो. लिंबू खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते (Lemon Tree). जे त्वचा आणि हेल्थसाठी उपयुक्त ठरते. लिंबू अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. प्रत्येक हंगामात लिंबाची मागणी कायम असते. पण उन्हाळ्यात लिंबू महाग होतात. त्यामुळे आपण लिंबू विकत घेताना जरा विचार करतो. किंवा लिंबाशिवाय पदार्थ तयार करतो.
लिंबाच्या वापराने अनेक वस्तू साफ होतात. पण प्रत्येक वेळीस महागडे लिंबू विकत आणून त्याचा वापर करणं शक्य नाही. त्यामुळे घराच्या बागेत, कुंडीत लिंबाचे रोप लावा. पण लिंबाचे रोप कसे लावावे? त्याची कशी काळजी घ्यावी? पाहा(4 tips to successfully grow lemon tree in a pot).
लिंबाचे रोप कसे लावावे?
- लिंबाचे रोप लावण्यासाठी मोठ्या कुंडीची आवशक्यता आहे. शिवाय लिंबाचे रोप किंवा लिंबाच्या बिया विकत आणा.
आपण खाताय ते पोही हेल्दी आहेत? वेट लॉससह इतर फायदे हवे असतील तर, पोहे 'या' तेलात करा..
- याशिवाय कुंडीत टाकण्यासाठी स्वच्छ माती आणि काही नैसर्गिक खताची आवश्यकता असेल.
उत्तम बियांचा वापर करा
बाजारात उत्तम प्रकारच्या बिया मिळतात. ज्याचा वापर करून आपण घरात लिंबाचे झाड लावू शकता. सर्वप्रथम, लिंबाच्या सर्व बियांची माहिती गोळा करा. किंवा आपण कोणत्याही बियाणे स्टोअरमधून सहजपणे चांगले बियाणे विकत आणू शकता. किंवा रोपटे आणा.
कुंडी महत्वाची
कुंडी खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. कुंडी मातीचे किंवा सिमेंटचे असावे आणि ते थोडे मोठे असावे. जेणेकरून लिंबाच्या मुळांना पसरणे सोपे होईल. भांडे आणल्यानंतर त्यात पाणी टाकून थोडावेळ राहू द्या. तसेच भांड्याच्या तळाशी एक लहान छिद्र करा. जेणेकरून अतिरिक्त पाणी निघून जाईल.
खताचा वापर करा
उत्तम झाडाच्या वाढीसाठी खत महत्वाचे. आपण खत म्हणून गायीचे किंवा म्हशीचे शेण घेऊ शकता. लिंबाच्या झाडाच्या उत्तम वाढीसाठी हे खत म्हणून उपयुक्त ठरतील. मातीत खत मिसळल्यानंतर त्यात रात्रभर पाण्यात भिजवलेले बिया २-३ इंच मातीत गाडावे. त्यानंतर थोडे थोडे पाणी देत राहा.
जिने चढताना-चालताना दम लागतो? जीवनशैलीत करा ४ सोपे बदल; पन्नाशीनंतरही राहाल फिट
माती तपासून पाणी द्या
थंड हवामानात, दर एक किंवा दोन दिवसांनी रोपाला पाणी द्या. झाडाला पाणी देण्यापूर्वी त्याची माती तपासा. जर तुम्हाला माती कोरडी वाटली तर झाडाला पाणी द्या. कारण जास्त पाणी दिल्याने झाडाची मुळेही कुजतात.