Lokmat Sakhi >Gardening > रात्री लवकर झोपच येत नाही? खोलीत 'ही' ५ रोपं ठेवा, रात्रभर लागेल गाढ-शांत झोप

रात्री लवकर झोपच येत नाही? खोलीत 'ही' ५ रोपं ठेवा, रात्रभर लागेल गाढ-शांत झोप

5 Plants That Help You Sleep Batter Than Ever (How to get Sleep Faster) : या झाडांमुळे घरातील वातावरण शुद्ध राहते आणि हवाही ताजी होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 10:41 AM2023-12-28T10:41:01+5:302023-12-28T15:39:41+5:30

5 Plants That Help You Sleep Batter Than Ever (How to get Sleep Faster) : या झाडांमुळे घरातील वातावरण शुद्ध राहते आणि हवाही ताजी होते.

5 Plants That Help You Sleep Batter Than Ever : 5 Bedroom Plants To Help Your Sleep Batter | रात्री लवकर झोपच येत नाही? खोलीत 'ही' ५ रोपं ठेवा, रात्रभर लागेल गाढ-शांत झोप

रात्री लवकर झोपच येत नाही? खोलीत 'ही' ५ रोपं ठेवा, रात्रभर लागेल गाढ-शांत झोप

दीर्घायुष्यासाठी शरीराला पोषक तत्वांची आवश्यकता असते. शारीरिक, मानसिक रूपात निरोगी राहण्यासाठी  खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक असते. त्याबरोबरच शरीरासाठी चांगली झोपही महत्वाची असते. (How to get Sleep Quickly) आजकाल प्रत्येकजण कामाची जबाबदारी, ताण-तणाव यांमुळे व्यवस्थित झोप येत नाही  याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.  चांगल्या झोपेसाठी तुम्ही व्यायाम करणं,  मेडिटेशन करणं आवश्यक असतं त्याचप्रमाणे खोलीत काही इन्डोअर प्लांन्टस लावले तर तुम्हाला शांत झोप येईल. (Plants for Good sleep)

रात्री शांत झोप हवी असेल तर तुमच्या खोलीत काही झाडे ठेवू शकता. ज्यामुळे तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होईल. अशा अनेक वनस्पती आहेत ज्या गाढ झोप येण्यास मदत करतात. (5 Bedroom Plants To Help Your Sleep Batter ) या झाडांमुळे घरातील वातावरण शुद्ध राहते आणि हवाही ताजी राहते. स्नेक प्लांट, एलोवेरा इत्यादी व्यतिरिक्त, इतर अनेक इनडोअर प्लांट्स आहेत जे झोप येण्यासाठी प्रभावी ठरतात. (5 Bedroom Plants That Improve Your Sleep)

घरात स्नेक प्लांट ठेवा

जर तुम्हाला शांत झोपायचे असेल तर तुमच्या खोलीत स्नेक प्लांट ठेवा. हे नैसर्गिक एअर प्युरिफायरसारखे काम करते. ते रात्री ऑक्सिजन सोडते, ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येते. हवेतील काही हानिकारक रसायने जसे की xylene, trichlorethylene, toluene, benzene आणि formaldehyde काढून टाकण्यासाठी देखील ओळखले जाते.

घरातला बांबू प्लांट वाढवण्यासाठी ३ सोप्या टिप्स, एकही पान पिवळं पडणार नाही- प्लांट राहील हिरवेगार

एलोवेरा

तुम्ही हॉलममध्ये किंवा बेडरूममध्ये एलोवेराचे लहानसे रोप ठेवू शकता. याचे अनेक आरोग्य आणि सौंदर्य फायदे देखील आहेत आणि झोप सुधारण्यास देखील मदत करते. कोरफड रात्री ऑक्सिजन तयार करते, जे तुमच्या बेडरूमच्या वातावरणासाठी उत्तम आहे.

लेवेंडर

तुम्ही तुमच्या खोलीत लेव्हेंडर प्लांट देखील ठेवू शकता. लेव्हेंडरचा सुगंध आराम आणि विश्रांती प्रदान करण्यासाठी ओळखला जातो. रक्तदाब आणि हार्टचे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फायदेशीर आहे. उशीवर  इसेंशियल लॅव्हेंडर स्प्रे किंवा लॅव्हेंडर तेल शिंपडण्याऐवजी खोलीत ताजे लॅव्हेंडर रोप ठेवा. मानसिक शांती मिळेल आणि गाढ झोप देतो.

इतरांचा मनी प्लांट भरभर वाढतो, तुमचा वाढत नाही? किचनमधला ‘हा’ पदार्थ वापरा, मनी प्लांट होईल हिरवागार

एरेका पाम

ही वनस्पती तुम्ही तुमच्या खोलीतही ठेवू शकता. एरेका पाम हे उत्तम एअर प्युरिफायरपैकी आहे.  हवेतील विषारी पदार्थ काढून टाकून हे रोप नैसर्गिक हवेतील आर्द्रता टिकवून ठेवते. ज्यामुळे तुम्ही रात्री झोपत असताना बेडरूममध्ये चांगल्या गुणवत्तेची हवा तुमच्यापर्यंत पोहोचते.

पीस लिली

बेडरूममध्ये कोरड्या हवेची समस्या असेल तर खोलीत पीस लिलीचं रोप ठेवा. पीस लिली बेडरूमची आर्द्रता 5% वाढवू शकते, ज्यामुळे कोरडी त्वचा, कोरडे केस, श्वसन समस्या कमी होतात. या रोपाला जास्त पाणी किंवा प्रकाश लागत नाही, म्हणून तुम्ही हे रोप पलंगाच्या अगदी जवळही ठेवू शकता. 

Web Title: 5 Plants That Help You Sleep Batter Than Ever : 5 Bedroom Plants To Help Your Sleep Batter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.