पदार्थाची शोभा आणि चव वाढवण्याचं काम हिरवीगार ताजी कोथिंबीर करते. कोथिंबीरीशिवाय पदार्थ अपुरे वाटते. बऱ्याचदा स्वस्त मिळते म्हणून आपण घरात कोथिंबीरीची जुडी आणतो. पण कोथिंबीर नीट स्टोर करून ठेवली नाही तर, ती कुजते आणि खराब होते. विकत आणलेली कोथिंबीर संपली की आपण पुन्हा बाजारात जातो. पण बाजारात जाण्यापेक्षा आपण घरातच कोथिंबीरीचे रोपटे लावू शकता (Coriander).
जर आपल्याला वारंवार बाजारात जावून कोथिंबीर विकत घ्यावी लागत असेल तर, घरातच कोथिंबीरीचे रोपटे लावून पाहा (Gardening Tips). काहींना कुंडीत कोथिंबीर लावायची कशी हे ठाऊक नसते. शिवाय कुंडीत खत घालूनही उगवत नाही. जर आपल्याला घरातच कोथिंबीरीचे रोपटे लावायचे असेल तर, काही टिप्स लक्षात ठेवा(5 Tips How to Grow a Ton of Coriander).
कोथिंबीरीचे रोपटे लावण्यापूर्वी लक्षात ठेवा काही टिप्स
- हिवाळ्यात कुंडीत कोथिंबीरीची योग्य वाढ होत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस कोथिंबीरीचे रोपटे बाल्कनीमध्ये ठेऊ नका. थंडीमुळे कोथिंबीर सुकते.
- कोथिंबीर कधीच लहानशा कुंडीत लावू नये. यामुळे कोथिंबीरीची व्यवस्थित वाढ होत नाही. त्यामुळे कोथिंबीर नेहमी मोठ्या किंवा कंटेनरमध्ये लावा.
तुळस वारंवार का सुकते? ४ कारणं, तुळशीची काळजी घेण्याचे पाहा सोपे उपाय
- कोथिंबीरीच्या रोपाला नेहमी पाणी घालू नये. जेवढी रोपट्याला पाण्याची गरज आहे, तेवढेच पाणी घाला. शिवाय माती ओली झाल्यानंतर अतिरिक्त पाणी घालू नका.
- कुंडीत कोथिंबीर लावण्यापूर्वी माती ओली करून घ्या. नंतर त्यात धणे घाला. धणे आपण ठेचून घालू शकता. यामुळे कोथिंबीर भरभर आणि हिरवीगार वाढेल. धणे घातल्यानंतर त्यावर माती घालून कव्हर करा, व पुन्हा पाणी घालू नका.
मातीत मिसळा फक्त ३ गोष्टी, कुंडीत लावलेले कडीपत्त्याचे झाडही होईल मोठे-पानं होतील सुगंधी
- जर आपण कोथिंबीरीची कुंडी घरातच सावलीखाली ठेवत असाल तर, त्याची योग्य वाढ होणार नाही. त्यामुळे कुंडी अशा ठिकाणी ठेवा, जिथे कोथिंबीरीच्या वाढीसाठी पुरेसं सूर्यप्रकाश मिळेल.