आपल्या घरासमोर इतर कोणतं रोप असो की नसो पण तुळस मात्र आवर्जून असते. तुळशीला रोज पाणी घालणे, तिला पुरेसं ऊन मिळेल याची काळजी घेणे, या सगळ्या गोष्टी तर आपण करतोच. पण तरीही कधी कधी तुळस सुकते. उन्हाळ्यात जशी तिला उन्हाची तीव्रता सहन होत नाही तशीच हिवाळ्यातही कडाक्याची थंडी सोसत नाही. थंडीचा कडाका वाढला की तुळशीची वाढ कमी होऊन ती कोमेजल्यासारखी होते. काही ठिकाणी तर तुळशीची पानंही गळू लागतात. म्हणूनच हिवाळ्यात तुळशीची काळजी घेण्यासाठी आणि तिला हिरवीगार, डेरेदार ठेवण्यासाठी काही गोष्टी करायला पाहिजेत (best fertilizer for tulsi plant in winter).. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहूया...(5 tips to take care of tulsi plant in winter)
हिवाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?
हिवाळ्यात तुळस सुकू नये म्हणून तिची कशी काळजी घ्यावी, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ shanticreationsofficial या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
थंडीमुळे तुमचंही चहा पिण्याचं प्रमाण वाढलंय का? तज्ज्ञ सांगतात चहा प्या; पण 'हे' पथ्य पाळा...
१. हिवाळ्यात बऱ्याचदा असं होतं की तुळस सुकून एका बाजुला झुकू लागते. अशावेळी कुंडीमध्ये तुळशीच्या बाजुला एखादी काडी खोचा आणि त्या काडीचा आधार देऊन तुळस उभी करा.
२. हिवाळ्यात रात्रीच्या वेळी तुळशीला कडाक्याचा गारठा सहन होत नाही. त्यामुळे अनेक जण तिच्यावर रात्रीच्यावेळी एखादा कपडा झाकून टाकतात. कपडा झाकताना तो थेट तुळशीवर टाकू नका. तुळशीच्या आजुबाजुला ३- ४ काड्या उभ्या करा आणि त्यावर तो कपडा अंथरा.
३. तुळशीला मंजिरी आल्या की त्या लगेच कापून टाका. तसेच मंजिरी कापताना त्याच्या खालची एक- दोन पानं कापली तरी चालतील.
हलवा करण्यासाठी गाजर किसण्याचा कंटाळा येतो? घ्या रेसिपी, गाजर न किसता हलवा तयार...
४. कोरफडीचा एक ५ ते ६ सेमीचा तुकडा घ्या. त्याचे लहान लहान काप करा आणि ते काप तुळशीच्या मातीमध्ये खाेचा. तसेच ग्लासभर पाण्यात चमचाभर हळद टाका आणि ते पाणी तुळशीला द्या. हिवाळ्यात हे तुळशीसाठी उत्तम खत आहे. महिन्यातून एकदा हा उपाय करा.
५. महिन्यातून एकदा तुळशीवर नीमऑईल शिंपडा. थंडीचे महिने संपेपर्यंत हा उपाय करा. तुळस छान हिरवीगार राहील...