Lokmat Sakhi >Gardening > घरात लावा ही ५ रोपं, एकही डास घरात दिसणार नाही - कुबट वासही गायब कायमचा...

घरात लावा ही ५ रोपं, एकही डास घरात दिसणार नाही - कुबट वासही गायब कायमचा...

5 Useful home plants which keeps mosquitoes away from home : How To Get Rid Of Mosquitos Using Plants : Plants That Helps To Keep Mosquitos Away : नैसर्गिक पद्धतीने डासांना पळवून लावण्यासाठी घरगुती नॅचरल उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2024 01:16 PM2024-11-12T13:16:09+5:302024-11-12T13:19:03+5:30

5 Useful home plants which keeps mosquitoes away from home : How To Get Rid Of Mosquitos Using Plants : Plants That Helps To Keep Mosquitos Away : नैसर्गिक पद्धतीने डासांना पळवून लावण्यासाठी घरगुती नॅचरल उपाय...

5 Useful home plants which keeps mosquitoes away from home How To Get Rid Of Mosquitos Using Plants Plants That Helps To Keep Mosquitos Away | घरात लावा ही ५ रोपं, एकही डास घरात दिसणार नाही - कुबट वासही गायब कायमचा...

घरात लावा ही ५ रोपं, एकही डास घरात दिसणार नाही - कुबट वासही गायब कायमचा...

सतत चावणारे डास आणि त्यामुळे येणारी खाज या गोष्टीला आपण सगळेच वैतागतो. रात्री गाढ झोपेत असताना डास चावून जर झोपमोड झाली तर या चावणाऱ्या  डासांचा अधिकच राग येतो आणि नकोसे होते. घरात काही विशिष्ट प्रकारची रोपं लावल्याने हे डास पळवून लावायला मदत होते. असे सतत चावणारे आणि त्रास देणारे डास पळवून लावण्यासाठी आपण केमिकल्सयुक्त कॉईल, माॅस्किटो रिपेलंट क्रिम किंवा मच्छर मारायचे रॅकेटचा वापर करतो. पण ही केमिकल्सचा आरोग्याला घातक असतात. लहान मुलांना आणि इतरांनाही त्यामुळे त्रास होऊ शकतो. यामुळे घरातील डास घराबाहेर पळवून लावण्यासाठी आपण काही नैसर्गिक उपायांचा वापर करू शकतो. डासांना पळवून लावण्यासाठी घरात विशिष्ट प्रकारची झाड लावण हा एक नैसर्गिक उपाय आपण करू शकतो(Plants That Helps To Keep Mosquitos Away).

घरातून मच्छर पळवून लावायचे असतील तर, घरात (How To Get Rid Of Mosquitos Using Plants) ही ५ झाडे लावा. या झाडांमुळे डास घरात शिरकाव करणार नाही. या नैसर्गिक उपायामुळे घरातील  ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. यासोबतच मच्छरांचा त्रास देखील कमी होतो. या झाडांच्या तीव्र गंधामुळे घरात डास शिरकाव करीत नाही. त्यामुळे ही ५ रोपं घरात नक्की लावा. घरातील डास पळवून लावण्यासाठी नेमकी कोणती रोपं घरात लावावीत ते पाहूयात(5 Useful home plants which keeps mosquitoes away from home).

डासांना पळवण्यासाठी घरात लावावीत अशी रोपं कोणती ? 

१. तुळस :- तुळशीला ज्याप्रमाणे धार्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे शास्त्रीयदृष्ट्याही तुळस अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. हवेतील कार्बनडायऑक्साइडचे प्रमाण कमी करुन ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी तुळस अतिशय उपयुक्त ठरते. तसेच डासांना दूर ठेवण्यासाठी तुळशीचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे तुमच्याकडे एकाहून जास्त ठिकाणी तुळशीची रोपे असतील तरीही चांगले.

तुळशीच्या रोपावर शिंपडा हे ‘पिवळं’ पाणी, तुळस कधीच कोमेजणार नाही- हिरवीगार तुळस वाढवेल प्रसन्नता...

२. झेंडू :- झेंडूचे फूल आपण घरात नियमितपणे देवाला वाहण्यासाठी किंवा इतर धार्मिक बाबींसाठी वापरतो. त्यामुळे तुम्ही गॅलरीमध्ये किंवा घराच्या खिडकीत झेंडूचे रोप लावल्यास घरात डास येण्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो. झेंडूचे रोप कुठेही सहज उपलब्ध होणारे असते. तसेच केशरी आणि पिवळ्या रंगाची ही फुले दिसतातही आकर्षक त्यामुळे तुमच्या घराची शोभा वाढण्यासही मदत होईल. या फुलांना असलेला वास काहीसा उग्र असतो. त्यामुळे डास, माशी यांना तो वास अजिबात आवडत नाही. म्हणून हे झाड लावलेले असेल त्याठिकाणी डास फिरकत नाहीत. तुम्ही एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या रंगांचे झेंडू घरात लावू शकता. 

३. पुदीना :- ही औषधी वनस्पती असून विविध औषधांमध्ये आणि स्वयंपाकातील पदार्थांतही पुदीन्याचा उपयोग होतो. या वनस्पतीला उग्र वास असल्याने डास लांब राहण्यास मदत होते. पुदीना घरातील कुंडीतही अगदी सहज वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही डासांना दूर ठेवण्यासाठी हे रोप घरात आवर्जून लावायला हवे.  

४.रोजमेरी :- रोजमेरीचे रोप डासांना पळवून लावण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. याच्या वासाने केवळ डासच नाही, तर माश्या आणि इतर किटकही निघून जाण्यास मदत होते. या फुलांचा वास उग्र असल्याने डास पळून जाण्यास मदत होते. या वासाची मॉस्किटो कॉईल आणि डासांना पळवणारी उदबत्तीही बाजारात विकत मिळते. हे रोप आपण आपल्या होम गार्डनमध्ये ठेवले तरी चालते, याठिकाणी ते छान वाढते. पण अशी जागा नसेल तर आपण घरातही हे रोप वाढवू शकतो.

दिवाळीत सजावट म्हणून वापरलेली गोंड्यांची फुलं, पणत्या फेकून न देता 'असा' करा वापर, कुंडीतील रोपांची वाढ होईल भरभर...

५. लवेंडर :- सुंदर लवेंडर वनस्पतीची फुले कोणाला आवडत नाहीत. पण या सुंदर फुलांचा गंध डासांना आवडत नाही. आपण याचे झाड घरी आणून ठेऊ शकता. याने घरातील सौंदर्य वाढते. यासोबतच डासांपासून आपली सुटका होईल. मात्र, त्यांना वेळोवेळी पाणी देत ​​राहा, व सूर्यप्रकाशही दाखवत राहा.

Web Title: 5 Useful home plants which keeps mosquitoes away from home How To Get Rid Of Mosquitos Using Plants Plants That Helps To Keep Mosquitos Away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.