सेलिब्रिटी आणि त्यांच्या आवडीनिवडी हा नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी एक चर्चेचा विषय असतो. कारण फावल्या वेळात आपले आवडते सेलिब्रिटी काय- काय करतात याबाबत सर्वसामान्यांच्या मनात उत्सूकता असतेच.. काही दिवसांपुर्वीच अभिनेत्री प्रिती झिंटा हिनेही तिला गार्डनिंगचा छंद असून तिने तिची परसबाग कशी फुलविली होती, याचे फोटो सोशल मिडियावर टाकले होते.. आता असेच आपल्या किचन गार्डनचे फोटो प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत..
या 'देसी गर्ल'ने शेअर केलेले फोटो चांगलेच व्हायरल झाले असून तिने नेमकं तिच्या गार्डनमध्ये लावलंय तरी काय, याबाबत तिच्या चाहत्यांना भलतीच उत्सूकता आहे. 'My beautiful herb garden' अशी कॅप्शन तिने फोटोंना दिली असून तिच्या बागेत ओवा, तुळस, कोथिंबीर आणि इतरही काही वनौषधी, मसाल्याची झाडे (Priyanka Chopra's herbs garden) दिसत आहेत. प्रियांका सध्या लाॅस एंजिल्स इथे राहत असून तिने तिथेही तुळस आणि इतर पारंपरिक मसाल्याची झाडे उगवलेली पाहून तिचे चाहते तिच्यावर जाम खुश झाले आहेत.
मसाल्याची झाडे लावताना काय काळजी घ्यावी..
तुम्हालाही तुमच्या अंगणात मसाल्याच्या झाडांची रोपटी लावायची असतील तर त्यासाठी वाचा या काही टिप्स..
- कोथिंबीर, पुदिना यांची रोपे लावणं अगदी सोपं आहे.
- कोथिंबीर लावायची असेल तर धने चुरून कुंडीत टाका. वरून थोडीशी माती भुरभुरा आणि कुंडीतील माती ओलसर राहिल याची काळजी घ्या.
- पुदिना झटपट रुजताे आणि भरपूर वाढतो. पुदिन्याचं रोप लावायचं असेल तर त्याची एखादी काडी जमिनीत खोचून द्या. व्यवस्थित पाणी द्या. महिनाभरातच भरपूर पुदिना येईल.
- तुळशीचं रोपट अंगणात लावणं आणि त्याची काळजी घेणं, यासाठीही खूप काही विशेष करण्याची गरज नसते.
- पुदिन्याप्रमाणेच ओव्याचं रोपटंही लगेच वाढतं.. त्यासाठीही खूप काही विशेष करण्याची गरज नसते.