बॉलीवूडपासून आता दूर असणारी अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Actress Twinkle Khanna) वेगवेगळ्या ॲक्टीव्हिटीमध्ये नेहमीच स्वत:ला गुंतवून ठेवत असते. ती लेखिकाही आहे. शिवाय तिला पियानो वाजवायलाही आवडतं. त्यामुळे ती पियानोही शिकते. शिवाय इंटेरियर डेकोरेटर म्हणून तर ती प्रसिद्ध आहेच. शिवाय सोशल मिडियावरही ती नेहमीच ॲक्टीव्ह असून वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स ती तिच्या चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते. आता नुकताच तिने एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला असून स्ट्रेस घालविण्यासाठी (How to relief stress?) ती नेमकं काय करते, हे तिने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. (Stress relief tips by Twinkle Khanna)
प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी कोणत्या तरी गोष्टीचा ताण येतोच. मग ते करिअरचे प्रश्न असो किंवा कौटूंबिक नातेसंबंधांमधले. कधी आर्थिक ताण असतो तर कधी मुलांचं टेन्शन असतं. मोठ्या माणसांनाच नाही तर हल्ली स्पर्धा वाढल्यामुळे विद्यार्थ्यांनाही करिअर, परीक्षा, अभ्यास अशा गोष्टींमुळे अस्वस्थ वाटतच असतं. मनावर ताण येतंच असतो. हा ताण कमी करण्यासाठी तुम्ही घरबसल्या काय करू शकता, हे ट्विंकलने एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे.
या व्हिडिओमध्ये ती सांगते की अगदी तरुण वयापासून माझ्या ३ इच्छा होत्या. एक म्हणजे माझी मुलं, माझ्याकडे असणारा एक पेट डॉगी आणि तिसरं म्हणजे गार्डन. कारण मला असं वाटतं की या ३ गोष्टी मनावरचा ताण कमी करण्यासाठी खूप उपयोगी ठरतात.
थंडी सुरू होताच डोक्यातला कोंडा वाढून केस गळणं सुरू? करून पहा ५ गुणकारी घरगुती उपाय
आता बऱ्याचदा असंही होतं की मुलं आणि कुत्रा या मुळे माझा अगदी मसाला भेजा फ्राय होऊन जातो. मग अशावेळी मी सगळं लक्ष माझ्या गार्डनकडे वळवते. गार्डनसाठी मोठी जागा नसली तरी बाल्कनीमध्ये का होईना पण थोडी झाडं लावा. कारण त्यामुळे तुमचा मूड लगेच बदलण्यास मदत होते, एकाग्रता वाढते, मनावरचा- शरीरावरचा थकवा दूर होण्यास मदत होते. आणि तुम्ही तुमच्या मनावरचा सगळा राग, ताण तिथे काढून टाकून मोकळं होऊ शकता. म्हणूनच एक छोटंसं का होईना पण गार्डन असावंच, असंही तिने सांगितलं आहे.