आपल्यापैकी सगळ्यांच्याच घरात किंवा बाल्कनीत असणार रोपं म्हणजे मनी प्लांट. सुंदर हिरव्यागार पानांचा मनी प्लांट कुंडीत लावा किंवा भिंतीवर वेल सोडा घराची शोभा आणखीनच वाढते. आजकाल बहुतेकजण घरात किंवा गार्डन आणि बाल्कनी मध्ये मनी प्लांटचे एक तरी रोपं लावतातच. उन्हाळ्याच्या दिवसांत सगळ्यांचं रोपांची जरा विशेष काळजी घ्यावी लागते. यातही जर मनी प्लांट सारखे नाजूक रोपं असेल तर त्याची काळजी घेणं फारच गरजेचे असते(Add These Home Made Fertilizer In Money Plant New Leaves Will Start Coming Plant Will Growth Faster).
एरवी भरभर वाढणारा मनी प्लांट उन्हाळ्यात मात्र अगदीच बेताने वाढतो. वातावरणातील उष्णतेमुळे काहीवेळा मनी प्लांटची पानं सुकतात, पानांची व्यवस्थित वाढ होत नाही तर कधी मूळ कुजतात तर कधी पानं पिवळी पडतात. यासाठीच जर उन्हाळ्यात तुमच्याही घरातील मनी प्लांटची वाढ खुंटली असेल किंवा पानं पिवळी पडली असतील किंवा अशा अजून काही समस्या असतील तर काही घरगुती उपाय करून पाहूयात. या काही खास घरगुती उपायांमुळे मनी प्लांटची वाढ पुन्हा जोमाने होऊ शकते.
मनी प्लांटची वाढ होण्यासाठी खास टिप्स...
१. खायचा सोडा :- मनी प्लांटच्या रोपाची वाढ होण्यासाठी खायचा सोडा अधिक फायदेशीर ठरु शकेल. यासाठी खायचा सोडा वापरून त्याचे पाणी तयार करून घ्यावे. यासाठी २ ग्लास पाणी घेऊन त्यात २ टेबसलस्पून खायचा सोडा घालावा. हे तयार पाणी मातीत किंवा जर तुम्ही पाण्यांत मनी प्लांट लावली असेल तर पाण्यांत मिसळावे, यामुळे मनी प्लांट अधिक झरझर वाढेल.
तुळशीची पाने इवलीशी, वाढतच नाहीत? करा ८ उपाय, तुळस वाढेल मस्त...
२. हळदीचे पाणी :- ग्लासभर पाण्यांत चमचाभर हळद मिसळून रोपांच्या मुळाशी हे पाणी ओतावे. यामुळे रोपाला आलेलं बुरशी किंवा इतर कीटक नाहीसे होतात, यामुळे रोपांची वाढ पुन्हा नव्याने होऊ लागते. हळदी प्रमाणेच आपण तुरटीचा देखील वापर करू शकता.
३. चहा पावडरचे पाणी :- चहा गाळून झाल्यानंतर तुम्ही उरलेली चहा पावडर धुवून त्याचे पाणी मनी प्लांट मध्ये घालू शकता. यासोबतच, तुम्ही चहा पावडर देखील घालू शकता. चहा पावडरचे पाणी हे मनी प्लांटसाठी एक प्रकारचे औषधी खत म्हणून फायदेशीर ठरते.
मनी प्लांटची वाढ व्हावी तसेच पाने पिवळी पडू नयेत म्हणून....
जर मनी प्लांटची योग्य काळजी घेतली तर त्याची भराभर वाढ होते. मनी प्लांटची हिरवी पाने रोपाला आणखी सुंदर बनवतात. यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. मनी प्लांट हिरवागार ठेवण्यासाठी, त्याला सौम्य सूर्यप्रकाश द्या. रोपाला थेट आणि तीव्र सूर्यप्रकाशात ठेवणे टाळावे. कुंडीतील वरील मातीचा थर कोरडा झाल्यावरच रोपाला पाणी द्या. वेळोवेळी रोपाला खत घालत राहा. आठवड्यातून १ ते २ वेळा मनी प्लांटची पाने पाण्याने स्वच्छ धुवावीत. रोप हिरवे राहावे म्हणून खराब पाने काढून टाकावी.