Lokmat Sakhi >Gardening > कुंडीतल्या रोपांना द्या पांढऱ्याशुभ्र खडूचा खाऊ! ‘असा’ वापरा खडू, बागेतली रोपं वाढतील भरभर

कुंडीतल्या रोपांना द्या पांढऱ्याशुभ्र खडूचा खाऊ! ‘असा’ वापरा खडू, बागेतली रोपं वाढतील भरभर

Gardening Tips: तुमच्या छोट्याशा बागेतील रोपं भरभरून वाढण्यासाठी खडूंचा हा एक सोपा उपाय करून बघा...(Amazing Benefits Of Chalk For Plant Growth)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2024 09:11 AM2024-09-03T09:11:50+5:302024-09-03T14:54:14+5:30

Gardening Tips: तुमच्या छोट्याशा बागेतील रोपं भरभरून वाढण्यासाठी खडूंचा हा एक सोपा उपाय करून बघा...(Amazing Benefits Of Chalk For Plant Growth)

amazing benefits of chalk for plant growth, how to use chalk for plant growth | कुंडीतल्या रोपांना द्या पांढऱ्याशुभ्र खडूचा खाऊ! ‘असा’ वापरा खडू, बागेतली रोपं वाढतील भरभर

कुंडीतल्या रोपांना द्या पांढऱ्याशुभ्र खडूचा खाऊ! ‘असा’ वापरा खडू, बागेतली रोपं वाढतील भरभर

Highlightsखडूमध्ये असणारं कॅल्शियम झाडांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरतं. झाडांसाठी खडू वापरल्यामुळे त्यांची वाढ तर जोमाने होते

घराचा एक कोपरा हिरवागार असला की तो पाहूनच मन कसं प्रसन्न होऊन जातं. आपल्या छोट्याशा बागेतल्या कुंडीतली झाडं जेव्हा फुलांनी बहरून जातात, हिरवीगार होतात तेव्हा त्यांच्याकडे बघून मनाला होणारा आनंद काही वेगळाच असतो. पण तीच रोपं जेव्हा हिरमुसून जातात, कोमेजून जातात तेव्हा मात्र काय करावे कळत नाही (how to use chalk for plant growth?). त्यासाठीच बघा हा एक खास उपाय- झाडांना द्या खडूचं खत..(Amazing Benefits Of Chalk For Plant Growth)


रोपांच्या वाढीसाठी खास उपाय

आत्तापर्यंत तुम्ही लिहिण्यासाठी खडू वापरला. आता तो झाडांसाठी कसा वापरायचा ते पाहूया. झाडांसाठी नेमक्या कोणत्या पद्धतीने खडूचा वापर करायचा याविषयीची माहिती walkwithnature_ या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

गणेशउत्सव 2024: खोबऱ्याची खिरापत करण्याची एकदम सोपी रेसिपी; १० मिनिटांत गणपतीच्या आवडीचा नैवेद्य तयार

त्यानुसार असं सांगितलं आहे की खडूमध्ये असणारं कॅल्शियम झाडांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरतं. झाडांसाठी खडू वापरल्यामुळे त्यांची वाढ तर जोमाने होतेच, पण जी फुलझाडं आहेत त्यांनाही भरभरून फुले येतात. मनीप्लांटच्या वाढीसाठी तर हे खडूचं खत अतिशय उत्तम मानलं जातं. हे खत तुम्ही झाडांना दिल्यास त्यांच्या वाढीसाठी मग इतर कोणत्याही खताची गरज नाही. 


 

रोपांसाठी कसा करायचा खडूचा वापर ?

तुम्ही दोन पद्धतीने रोपांसाठी खडू वापरू शकता.

पहिली पद्धत म्हणजे कुंडीतल्या मातीमध्ये एका कोपऱ्यात एक खडू खोचून ठेवा. जसं जसं तुम्ही रोपांना पाणी घालाल तसं तसं थोडा थोडा खडू विरघळून त्याच्यातलं कॅल्शियम रोपांना मिळत जाईल. 

केस वाढतील भराभर, त्वचाही होईल सुंदर- तुकतुकीत, बघा कसा करायचा खोबरेल तेलाचा वापर

दुसरी पद्धत म्हणजे खडूचा भुगा करून घ्या. तो पाण्यामध्ये मिसळा आणि मग हे पाणी रोपांना घाला. 

महिन्यातून एक किंवा दोन वेळा हा उपाय करावा.

 

Web Title: amazing benefits of chalk for plant growth, how to use chalk for plant growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.