विचार करा की आपण एका रिक्षात बसलो आहोत.. रिक्षात बसल्यावर आपल्या आजुबाजुला सगळी हिरवीगार, पानाफुलांनी बहरलेली छोटी- छोटी इवलीशी रोपटी आहेत... मस्त फुलांचा सुगंध आपल्या आजुबाजुला दरवळतोय आणि सगळीकडे हिरवळ असल्याने उन्हाचा तडाखा जाणवतच नाहीये... आहाहा असा विचार करून सुद्धा मनाला एकदम फ्रेश वाटू लागलं ना? अशीच रिक्षात प्रत्यक्षात तयार केली आहे, दक्षिण भारतातल्या एका पर्यावरणप्रेमी रिक्षावाल्याने (auto driver creates garden in his auto)...
Nothing is impossible to a willing heart..
— Sudha Ramen 🇮🇳 (@SudhaRamenIFS) April 14, 2022
This great man shows the way. pic.twitter.com/NiXgYf4DVS
या रिक्षेचे फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले असून त्याच्या रिक्षेत बसण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. @SudhaRamenIFS या ट्विटर पेजवर रिक्षाचे फोओ शेअर करण्यात आले आहेत. रिक्षेवर लिहिलेला मजकूर पाहून ही रिक्षा दक्षिण भारतातील आहे, हे समजते.. मनीप्लांट, गुलाब, वेगवेगळी सजावटीची झाडे, वेली असं खूप काही त्याने रिक्षात लावलेलं आहे. रिक्षाची उजवी बाजू पुर्णपणे झाडांनी सजवून टाकण्यात आली आहे... या रोपट्यांची काळजी घेणे, रिक्षात लहान मुले बसली तर ते झाडांची पाने- फुले तोडत आहेत का, याकडे लक्ष देणे, झाडांना पाणी देणे अशा सर्व गोष्टी हे रिक्षा गार्डन मेंटेन ठेवण्यासाठी कराव्या लागतात.
सोशल मिडियावर या रिक्षेचे मनापासून कौतूक केले जात असून अशा रिक्षेत बसायला आम्हालाही खूप आवडेल अशी उत्स्फुर्त प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिली आहे. काही जणांनी रिक्षा चालकाच्या या कल्पनेचे तर कौतूक केलेच पण त्याला आता रिक्षाच्या छतावरही auto top garden फुलवावे, अशा सुचना केल्या आहेत.. एकंदरीतच अनेक जणांना हा रिक्षा गार्डनचा प्रयोग भलताच आवडला असून प्रत्येकानेच यातून प्रेरणा घ्यावी आणि शक्य असेल तिथे झाडे लावण्याचा आणि ती जगविण्याचा प्रयत्न करावा, असे नेटकरी म्हणत आहेत.