Lokmat Sakhi >Gardening > गुलाबाला भरपूर फुलं यावीत तर अजिबात करु नका ३ चुका, कुंडीतल्या गुलाबाला येईल छान बहर...

गुलाबाला भरपूर फुलं यावीत तर अजिबात करु नका ३ चुका, कुंडीतल्या गुलाबाला येईल छान बहर...

Avoid 3 Mistakes if you want more flowers to rose plant gardening tips : रोपाची काळजी घेताना लक्षात ठेवायला हव्यात अशा गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2024 05:39 PM2024-01-31T17:39:23+5:302024-01-31T17:41:05+5:30

Avoid 3 Mistakes if you want more flowers to rose plant gardening tips : रोपाची काळजी घेताना लक्षात ठेवायला हव्यात अशा गोष्टी...

Avoid 3 Mistakes if you want more flowers to rose plant gardening tips : If you want a rose to have a lot of flowers, don't do 3 mistakes, a rose in a pot will bloom beautifully... | गुलाबाला भरपूर फुलं यावीत तर अजिबात करु नका ३ चुका, कुंडीतल्या गुलाबाला येईल छान बहर...

गुलाबाला भरपूर फुलं यावीत तर अजिबात करु नका ३ चुका, कुंडीतल्या गुलाबाला येईल छान बहर...

आपण सगळेच रोज इतक्या धावपळीत असतो की आपल्याला आपल्या आजुबाजूला पाहायलाही वेळ होत नाही. आपण राहतो त्या घरात  आपल्याला छआन वाटावं यासाठी आपण किमान तुळस, मोगरा, जास्वंद, झेंडू, सदाफुली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुलाबाचे काही प्रकार अशी रोपे तरी आवर्जून लावतोच. आपण या रोपांना नियमित पाणी घालतो. त्यांना हवा-उजेड मिळेल असे पाहतो, पण त्याहून जास्त त्यांची मशागत करायला आपल्याला जमतेच असे नाही (Avoid 3 Mistakes if you want more flowers to rose plant gardening tips).

रोजच्या धावपळीत झाडाला पाणी घालताना अचानक गुलाबाला फूल आलेले पाहून आपण मनोमन खूशही होतो. पण काहीवेळा आपल्या कुंडीतला गुलाब वाढतो मात्र त्याला काही केल्या फुलं येत नाहीत. एकाएकी फुलं येणं बंद झाल्याने आपणही थोडे हिरमुसतो आणि फुलं येण्यासाठी नेमकं काय करावं आपल्याला कळत नाही.पण गुलाबाच्या रोपाला भरपूर फुलं यावी असं तुम्हाला वाटत असेल तर ३ चुका आवर्जून टाळायला हव्यात . 

(Image : Google)
(Image : Google)

१. प्रमाणापेक्षा जास्त पाणी देणं

काहीवेळा रोपांमधील माती सुकली म्हणून आपण त्यांना जास्तीचे पाणी घालतो. पण गुलाबाच्या रोपाला प्रमाणापेक्षा जास्त पाणी घातले तर या रोपाची वाढ खुंटण्याची शक्यता असते. तसेच पाने गळून हे रोप खराब होऊ शकते म्हणून गुलाबाला गरजेइतकेच पाणी द्या. 

२. माती उकरणे

गुलाबाच्या रोपांमधील माती दर १५ दिवसांनी उकरायला हवी. माती नियमित उकरून मोकळी केली नाही तर वरची माती घट्ट होऊन जाईल आणि खालच्या मातीतून रोपाला पुरेसे  पोषण मिळणार नाही. याशिवाय आपण मातीमध्ये पाणी, खत जे काही घालतो ते रोपाच्या मुळाशी जायला हवे असेल तर माती वेळच्या वेळी नीट मोकळी करायला हवी. 

३. सूर्यप्रकाश

कोणत्याही रोपाला वाढण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश गरजेचा असतो. पण गुलाबाच्या रोपाला जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश मिळायला हवा. भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तर हे गुलाबाचे रोप चांगले वाढते आणि त्याला भरपूर फुलं येण्यास मदत होते. 

ट्राय करा एक सोपा उपाय

वरील सर्व उपाय करूनही जर रोपाला बहर येत नसेल तर एक लिटर पाण्यात चमचाभर पोटॅशियम घालावे. हे पा रोपावर फवारल्यास रोपाची चांगली वाढ होण्यास मदत होते.
 

Web Title: Avoid 3 Mistakes if you want more flowers to rose plant gardening tips : If you want a rose to have a lot of flowers, don't do 3 mistakes, a rose in a pot will bloom beautifully...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.