घरासमोर मोठ्ठं अंगण आणि त्यात लावलेली वेगवेगळी झाडं- फुलं हे चित्र आता मोठ्या शहरांतून तर दुर्मिळच झालं आहे. शिवाय मोठ्या होऊ पाहणाऱ्या शहरांतूनही वेगाने पुसत चाललं आहे. फ्लॅट संस्कृतीमुळे हल्ली अनेकांना त्यांची गार्डनिंगची हौस छोट्याशा बाल्कन्यांमधूनच भागवावी लागते आहे. पण बाल्कनी लहान असली, गार्डनिंगसाठी जागा कमी असली तरी हिरमुसून जाऊ नका (How to decorate small balcony with plants?). कारण कमी खर्चात, कमी वेळात आणि कमी गोष्टींचा वापर करूनही खूप छान बाल्कनी सजवता येते (tips for balcony makeover at minimum cost). ते नेमकं कसं करायचं ते आता पाहूया (Balcony decoration ideas)....
छोटीशी बाल्कनी सजविण्यासाठी काही खास टिप्स....
१. व्हर्टिकल गार्डनिंग
कमी जागेमुळे हल्ली व्हर्टिकल गार्डनिंग खूप ट्रेण्डमध्ये आहे. तुम्हाला पाहिजे ती झाडं आडवी न लावता, उभी लावायची आणि त्या झाडांनीच संपूर्ण भिंत हिरवीगार करून टाकायची.
काखेत खूपच घाम येतो- हात वर करताच घामाची दुर्गंधी? १ सोपा उपाय करा, परफ्यूम मारण्याचीही गरज नाही
यामुळे तुमची भरपूर रोपटी लावण्याची हौसही भागते आणि शिवाय बाल्कनीची एक बाजू वेगवेगळ्या झाडा- फुलांनी सजून जाते.
२. वेगवेगळे प्लान्टर
चॉकलेटी रंगाच्या प्लास्टिकच्या किंवा मातीच्या कुंड्या मोठ्या अंगणात किंवा मोठ्या जागेत ठीक आहे.
तब्येत चांगली ठेवायची तर ४ पदार्थ खाणं ताबडतोब बंद करा, बघा तुम्ही यापैकी कोणते पदार्थ किती खाता?
पण आपल्याकडे जागा कमी असल्याने ती आपल्याला सुबक, देखण्या वस्तू वापरून सजवायची आहे. त्यामुळे कोणत्याही टिपिकल कुंड्या बाल्कनीसाठी घेऊ नका. हल्ली प्राण्यांचे- पक्ष्यांचे खूप वेगवेगळे आकार असणारे सिरॅमिकचे आकर्षक प्लान्टर मिळतात. तसे प्लान्टर आणून तुमची बाल्कनी सजवा.
३. ग्रीन ग्रास
बाल्कनीचा लूक सगळाच बदलून टाकायचा असेल तर बाल्कनीमध्ये ग्रीन ग्रास नक्की टाका.
डबल बेड कॉटन बेडशीट फक्त ५०० रुपयांत, बघा ३ मस्त पर्याय- वर्षभराची खरेदी एकदाच करून टाका
यामुळे सगळी बाल्कनीच छान हिरवीगार दिसते. त्यामुळे मग बाल्कनीतली इतर झाडं, प्लान्टर आणि अन्य शोभेच्या वस्तूही आणखीनच उठून दिसतात.