Join us  

घरी स्नेक प्लान्ट आहे? करा त्यापासून असे भन्नाट क्राफ्ट.. बघा एक से एक आयडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 3:21 PM

Gardening Tips: कागदांचं क्राफ्ट जसं असतं तसंच ते झाडांचंही असतं.. आता प्लान्ट क्राफ्ट (plant craft) म्हणजे नेमकं काय आणि स्नेक प्लान्टपासून ते कसं करायचं, याविषयीची ही माहिती...

ठळक मुद्देआजवर आपण कागदापासून भरपूर वेळा क्राफ्ट केले. आता थोडा पानांचा खेळ खेळून पहा.

जी झाडं अगदी सहज येतात आणि वाढतात किंवा ज्या झाडांची खूप काही काळजी घ्यावी लागत नाही, अशा झाडांपैकी एक म्हणजे स्नेक प्लान्ट (snake plant).. लांबसडक हिरव्यागार झाडांचं स्नेक प्लान्ट वाढवणं खूप सोपी गोष्टी. बरं हे रोपटं इतकं ॲडजेस्टिव्ह आहे की सावलीत ठेवा, घरात आणा किंवा काही काळ उन्हात ठेवा. स्नेक प्लान्ट बरोबर आहे त्या वातावरणाशी स्वत:ला जुळवून घेतं आणि तग धरून राहतं. शिवाय या झाडाला खूप पाण्याची गरजही नसते.

 

म्हणूनच या स्नेक प्लान्टला आपण हव्या त्या पद्धतीने लावू शकतो आणि त्याच्यापासून वेगवेगळे क्राफ्ट करू शकतो. आजवर आपण कागदापासून भरपूर वेळा क्राफ्ट केले. आता थोडा पानांचा खेळ खेळून पहा. सध्या सुट्ट्याच आहेत. त्यामुळे तुमच्या या उपक्रमात बच्चे कंपनीलाही सहभागी करून घेता येईल. स्नेक प्लान्टचे २ प्रकार असतात. एक प्रकार उंचीने कमी असतो, तर दुसऱ्या प्रकारातल्या रोपट्याची पाने उंच वाढतात. हा स्नेक प्लान्ट क्राफ्ट तयार करण्यासाठी स्नेक प्लान्टची टॉल व्हराईटी वापरा. (garden decoration with snake plant)

 

स्नेक प्लान्ट क्राफ्ट तयार करण्यासाठी....अशा पद्धतीचं क्राफ्ट करायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे स्नेक प्लान्टची अनेक पानं पाहिजेत. यासाठी नर्सरीतून स्नेक प्लान्ट विकत आणण्याची मुळीच गरज नाही. तुमच्याकडे जी काही पाने आहेत त्याचे दोन दोन तुकडे करा. हे तुकडे एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात बुडवून ठेवा. दोन- तीन दिवसांत त्यांना मुळे येतील. मुळं आली की ती एखाद्या कुंडीत लावून टाका.अशा पद्धतीने एखाद्या पसरट कुंडीत बरीच पाने लावता येतील आणि पाहिजे तशी वाढवता येतील.

 

स्नेक प्लान्टची वेणीपानांची छानपैकी वेणी घालायची असेल तर तुमच्याकडे कापलेले लांब पानं कापा. त्याची वेणी घाला आणि ही पानं दोन ते तीन दिवस पाण्यात बुडवून ठेवा. त्यांना खालून पांढरट मुळं फुटली की ती मातीत लावून टाका. हे झाड पुढेही तसेच वाढत जाते.  

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीगच्चीतली बाग