Join us  

घराच्या बाल्कनीत लावा सुंदर क्लाईंबिग प्लांट्स; खर्च १०० रूपयांपेक्षा कमी, वेलींनी सजेल घर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 1:02 PM

Best climbing plants for front of house (Gharat konti zade lavavi) : क्लाईंबिंग प्लांट्स लावण्यासाठी तुम्हाला मोठ्या आकाराची कुंडी, खत, माती, बियाणे आणि पाण्याची आवश्यकता असेल.

सुंदर, सुगंधित झाडं फक्त घराला सुशोभित करत नाही तर घराची शोभासुद्धा वाढवतात.  (Best Tips for Gardening) अशी झाडं पाहिल्यानंतर घरात आलेल्या प्रत्येकाच्याच मनाला आनंद होतो. अनेकांना क्लाईंबिग प्लाटंस बाल्कनीपासून घराच्या अंगणात लावायला आवडतात. (How to Grow and Take Care of Indoor Plants) ज्यामुळे सकारात्मक वातावरण राहतं आणि मनालाही प्रसन्न वाटते. (Climbing Plants Great for Indian Balconies)

घरात लावण्यासाठी  उत्तम क्लायम्बिंग प्लांट्स कोणते?

बोगेनविलिया, ब्लू मॉर्निंग ग्लोरी, स्टार जॅस्मिन, बंगाल क्लॉक वाईन, मनी प्लांट्स, नास्टर्टियम, स्वीट पी फ्लावर, जॅस्मिन ही झाडं तुम्ही लावू शकता.  (Gharat lavnyasathi zade) क्लाईंबिंग प्लांट्स लावण्यासाठी तुम्हाला मोठ्या आकाराची कुंडी, खत, माती, बियाणे आणि पाण्याची आवश्यकता असेल. (Gardening tips for indoor plants)

बियाणांची योग्य निवड

होम गार्डनमध्ये झाडं लावण्यासाठी बियाणांची योग्य निवड करणं गरजेचं आहे. जर बियाणे योग्य नसतील तर फळांपासून फुलांपर्यंत कोणतीही झाडं लवकर खराब होण्याचा धोका असतो. म्हणूनच क्लायम्बिंग प्लांट्सची बीयाणे योग्य असणं गरजेचे असते.  क्लायम्बिंग प्लांट्स स्वस्तात विकत घ्यायचे असतील तर तुम्हाला नर्सरीत जावे लागेल. कमीत कमी किमतीत तुम्हाला बियाणेही उपलब्ध होतील. 

१ वाटी ज्वारीच्या पीठाच्या करा खमंग-काटेरी चकल्या; कमी साहित्यात-झटपट बनेल परफेक्ट चकली

क्लायम्बिंग प्लांट्स लावल्यानंतर काय  काळजी घ्यावी

क्लायम्बिंग प्लांन्ट्स होम गार्डन किंवा बाल्कनीमध्ये लावणं काही कठीण काम नाही. बाल्कनीत बीयाणे लावण्याआधी तुम्हाला काही गार्डनिंग टिप्स फॉलो कराव्या लागतील. आधी ज्या मातीचा तुम्ही कुडींत वापर करणार आहात ती माती फोडून एक दिवसासाठी उन्हात ठेवा.

भरपूर पुडाचे, बिस्किटासारखे खुसखुशीत शंकरपाळे करण्याची परफेक्ट रेसिपी-तोंडात टाकताच विरघळतील

मातीत उन्हात ठेवल्याने मातीतील किटक दूर होण्यास मदत होते. यातील मॉईश्चरही दूर होते. मातीत ३ कप खत  घालून व्यवस्थित एकजीव करा.  माती १-२ इंच खोल खणून यात बीयाणे घाला वरून पुन्हा माती घाला. मातीत २-३ मग पाणी घालायला विसरू नका.

क्लायम्बिंग प्लांट्स खराब होऊ नयेत यासाठी काय करावे

१) क्लायम्बिंग प्लांडट्सना उन्हापासून दूर ठेवा. तीव्र उन्हात ठेवल्यामुळे या खराब होऊ शकते.

२) चांगल्या वाढीसाठी वेळेवर पाण्याचे स्प्रे मारत राहा.  

३) बियाणांमध्ये किड लागू नये यासाठी वेळोवेळी किटकनाशकांचा स्प्रे शिंपडत राहा.

४) सेंद्रीय खतांचा वापर करा.

५) झाडं वाढल्यानंतर तुम्ही बाल्कनीत ठेवू शकता. 

टॅग्स :बागकाम टिप्सकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.