Lokmat Sakhi >Gardening > जास्वंदीला भरपूर फुलं येण्यासाठी कशी घ्यायची रोपाची काळजी? जास्वंदीवर लवकर कीड पडते कारण..

जास्वंदीला भरपूर फुलं येण्यासाठी कशी घ्यायची रोपाची काळजी? जास्वंदीवर लवकर कीड पडते कारण..

Best Fertilizer For Hibiscus : जास्वंदाचं फुल दिसायला जितकं सुंदर दिसतं तितकंच ते नाजूकही असतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 08:27 PM2024-10-06T20:27:32+5:302024-10-07T18:07:08+5:30

Best Fertilizer For Hibiscus : जास्वंदाचं फुल दिसायला जितकं सुंदर दिसतं तितकंच ते नाजूकही असतं.

Best Fertilizer For Hibiscus : How To Make Bloom Hibiscus At Home | जास्वंदीला भरपूर फुलं येण्यासाठी कशी घ्यायची रोपाची काळजी? जास्वंदीवर लवकर कीड पडते कारण..

जास्वंदीला भरपूर फुलं येण्यासाठी कशी घ्यायची रोपाची काळजी? जास्वंदीवर लवकर कीड पडते कारण..

ज्या लोकांना गार्डनिंगची आवड असते त्यांना घरात किंवा इतर ठिकाणी झाडं लावायला फार आवडते.  घरात जास्वंदाचे रोप खूपच सुंदर दिसते. जास्वंदाचे रोप बागेत लावणं उत्तम ठरतं. कारण या रंगेबिरंगी फुलांनी बाग सुंदर दिसते. (Best Fertilizer For Hibiscus)  जास्वंदाचं फुल दिसायला जितकं सुंदर दिसतं तितकंच ते नाजूकही असतं. (How To Make Bloom Hibiscus At Home) म्हणूनच रोपाची खास काळजी घ्यावी लागते. बऱ्याच लोकांची तक्रार असते की,  जास्वंदाच्या रोपाला फक्त पानंच येतात फुलं येत नाही. हे टाळण्याासठी रोपांची खास काळजी घेणं गरजेचं असतं. (Gardening Tips)

जास्वंदाच्या रोपाची माती थोडी ओलसर आणि सुपिक असणं गरजेचं आहे. जर माती खूपच कोरडी असेल तर खतांतील नायट्रोजनमुळे मुळं जाळून झाडाचं नुकसान करू शकतात.  जास्वंद कधीच पूर्णपणे कोरडं होऊ न देणं हेच उत्तम आहे.

वजन कमीच होत नाही? पाळी येऊन गेल्यानंतर १० दिवस हे पदार्थ खा; कमी होईल वजन

खतांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तिन्ही घटक असायला हवेत ज्यामुळे रोपांची वाढ चांगली होते.  हे खत तुम्ही २० ते ३० दिवसांतून एकदा घालू शकता. याशिवाय महिन्यातून एकदा किटक नाशकांची  फवारणी करा. 

जास्वंदाला पाण्याची गरज

 जास्वंदाला आपल्या रोपाला गरजेनुसार पाणी घालावं लागते. तुम्ही  कमी पाणी घातलं तरीही फुलं येणार नाही आणि गरजेपेक्षा जास्त पाणी घातलं तरीही फुलं येणार नाहीत. कुंडीत रोप लावल्यास  मातीच्या प्रमाणात पाणी घालावं लागेल. 

रोपाची माती बदला

जास्वंदाच्या रोपाची माती ६ महिन्यांनी बदलत राहाल तर यात पूर्ण वर्ष फूलं येतील. मातीत जितकी पोषक तत्व असतात तितकेच फुलं येण्याची संभावना जास्त असते. मातीच्या मुळांना थोडं ट्रिम करून घ्या. नंतर कुंडीत घाला. यामुळे झाडाला भरपूर फुलं येतील.  या पद्धतीनं तुम्ही रोपाची लाईफ वाढवू शकता.
जास्वंदाच्या रोपाला उन्हाची गरज असते.

वरचे दात पिवळे-आतून किड लागली? दात घास १ छोटा बदल करा, मोत्यांसारखे चमकतील दात

जास्वंदाच्या रोपाला ऊन आणि हवा दोन्हींची गरज असते. म्हणूनच जास्वंदाचे रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे सुर्यप्रकाश भरपूर मिळेल. याशिवाय २ ते ३  दिवसांत याची पानं धुवून राहा. उन्हाळ्याच्या सिजनमध्ये रोज पानं धुवून घ्या. यातील मिली बग्समुळे जास्वंदाची पानं, फुलं खराब होतात. म्हणून जास्वंदाच्या फुलाला मुंग्या, किडे  लागणार नाहीत.

Web Title: Best Fertilizer For Hibiscus : How To Make Bloom Hibiscus At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.