उन्हाळा म्हणजे मोगरा, मधुमालती, मधुकामिनी या सुगंधित फुलांच्या बहरण्याचा ऋतू.. सगळीकडे उन्हाचा कडाका वाढलेला असताना ही सुगंधित फुलं मनाला शांती देऊन जातात. त्यामुळे मोगऱ्याचं छाेटंसं रोप तरी आवर्जून अनेकजण त्यांच्या बागेत लावतातच. पण मोगऱ्याला पाहिजे तशी फुलं येतच नाहीत, तो छान बहरतच नाही अशी तक्रार काही जणांची असते (best fertilizer for mogra plant). तुमचीही अशीच तक्रार असेल तर आता लगेचच या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्येच या काही गोष्टी करायला सुरुवात करा (best gardening tips for blooming mogra). त्यामुळे तुमच्या मोगऱ्याच्या रोपाला अगदी फेब्रुवारीतच भरपूर फुलं येतील.(how to get maximum flowers from mogra?)
मोगरा छान बहरून येण्यासाठी कशी काळजी घ्यावी?
१. मोगऱ्याचा बहरण्याचा काळ आता लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे सध्या अशा थंड वातावरणात त्याला वारंवार पाणी घालू नये. माती थोडी कोरडी राहू द्यावी. कारण जास्त पाण्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.
२. थंडीच्या दिवसात मोगऱ्याला थोडी उब मिळावी यासाठी तो अशा ठिकाणी ठेवा जिथे २ ते ३ तास त्याला चांगलं ऊन मिळेल.
जावेद हबीब सांगतात घरी हेअर कलर करताना 'ही' चूक करणं पडेल महागात- केसांचं होईल नुकसान
३. या दिवसांत अनेकजण मोगऱ्याची छाटणी करतात. पण तसं करू नये. कारण या दिवसांत त्यांची इम्युनिटी आधीच खूप कमी झालेली असते. त्यामुळे छाटणी केलेल्या ठिकाणी त्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
४. कुंडीतली माती थोडी भुसभुशीत करून घ्या. यामुळे रोपांच्या मुळापर्यंत व्यवस्थित ऑक्सिजन जाईल.
मोगऱ्याच्या रोपाला कोणते खत घालावे?
माेगऱ्याच्या रोपाला भरभरून फुलं येण्यासाठी कोणतेही विकतचे खत घालण्याची गरज नाही. कारण आपण स्वयंपाकात घरात जे पदार्थ वापरतो त्यापैकीच काही पदार्थ मोगऱ्यासाठी अतिशय पोषक ठरतात. त्यापैकी पहिला पदार्थ आहे मेथी दाणे. यासाठी मेथी दाणे मिक्सरमधून फिरवून घ्या आणि त्याची थोडी पावडर करा.
वर्षभराचे मसाले बरण्यांत भरताय? लक्षात ठेवा ५ टिप्स- मसाल्यांची चव आणि सुगंध वर्षभर टिकेल
ही एक चमचा पावडर कुंडीतल्या मातीमध्ये व्यवस्थित मिसळून टाका. १५ दिवसांतून एकदा हा उपाय करा.
त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे अर्धा चमचा हळद घ्या आणि ती सुद्धा मोगरा लावलेल्या कुंडीतल्या मातीमध्ये मिसळून टाका. हा उपायही १५ दिवसांतून एकदा करावा. हे दोन्ही उपाय जानेवारी महिन्यात केल्यास तुमच्या मोगऱ्याला खूप लवकर बहर येईल.