फुलं (Flowers) पाहिली की मनाला प्रसन्न वाटतं. (Gardening Tips) अनेकजण गार्डनमध्ये, बाल्कनीत मोगऱ्याचं रोप लावतात. मोगऱ्याच्या सुगंधाने संपूर्ण घरात चांगले वातावरण राहते आणि प्रसन्न वाटतं, मन शांत राहते. या झाडामुळे स्ट्रेससुद्धा कमी होतो. मोगऱ्याचे रोप व्यवस्थित वाढत नाही अशी अनेकांची तक्रार असते. मोगऱ्याच्या रोपासाठी मान्सून फर्टिलायजर (Mogra Plant) फायदेशीर मानले जाते. (Magical Fertilizer For Mogra Jasmine Plant)
मोगऱ्याला फुलं येण्यासाठी काय करावे? (How To Make Mogra Plant
मोगऱ्याला फुलं येत नसतील तर हार्ड किंवा सॉफ्ट प्रुनिंग करा. १५ दिवसांच्या अंतरात माती वर-खाली नक्की करा, मोगऱ्याचे रोप काहीवेळ ऊन्हात ठेवा, नर्सरीमधून डबल पेटलचं रोप विकत घ्या. ज्यामुळे तुम्हाला जास्त मोठी फुलं मिळतील. मोगऱ्याला अर्धवट ते पूर्ण सुर्यप्रकाश आवश्यक असल्याने तुमच्या घरच्या रचनेनुसार घरातील किंवा बाहेरचे योग्य ठिकाण निवडा. वर्षातून ३ ते ४ वेळा मोगऱ्याला खत घाल्याने पटापट वाढ होईल.
ट्रस्ट बास्केटच्या गार्डिनिंग टिप्सनुसार मोगऱ्याच्या फुलांची भरपूर वाढ होण्यासाठी गुणवत्तायुक्त फॉस्फरस रिच फर्टिलायजर तुम्हाला आवश्यक असेल. मोगऱ्याच्या रोपाला पांढऱ्या माश्या, एफिड्स, काळ्या रंगाचे किटक नष्ट करू शकतात. जेव्हा रोपावर किटकांचा प्रादुर्भाव होईल तेव्हा त्वरीत तेव्हढा भाग कापून टाका. झाडाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कडुलिंबाच्या तेलासारख्या बुरशीनाशकाची फवारणी करा. जर तुमच्याकडे एक सुंदर खिडकी असेल जिथे सूर्यप्रकाश अर्धा दिवस पडतो आणि नंतर छान सावली असेल तर तुम्ही मोगरा घरात ठेवू शकता. जर तुमच्या बागेत अशी अनुकूल स्थिती असेल तर मोगरा बागेतही ठेवू शकता.
मोगऱ्यासाठी उत्तम खत कोणतं? (Best Fertilizer For Mogra Plant)
पांढऱ्या फुलांच्या रोपासाठी कॅल्शियमची जास्त आवश्यकता असते. यासाठी बोनमील (Bonemeal) हे उत्तम फर्टिलायजर आहे. यात फॉस्फरस, कॅल्शियम यांसारखी पोषक तत्व असतात. तुम्ही बोनमील कुठल्याही रोपांत घालू शकता. ८ इंचाच्या कुंडीत २ चमचे बोनमील घाला. रोपात बोनमील घालण्याआधी खोदून घ्या. माती जास्त मॉईश्चर असेल तर त्यात पाणी घालू नका.
अंड्याच्या सालीत भरपूर कॅल्शियम असते. अंड्याचे साल धुवून सुकवून घ्या. सुकवल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक दळून घ्या. २ चमचे पावडर रोपात मिसळा. महिन्यातून एकदा या रोपात कॅल्शियमयुक्त खत घाला. ज्यामुळे रोपाची वाढ दुप्पटीने होईल आणि सुंदर फुलं येतील.