Join us  

गुलाबाच्या झाडाला फुलं येत नाहीत? कचऱ्यातले 'हे' पदार्थ मातीत मिसळा, येतील फुलंच फुलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 5:55 PM

Best Fertilizer For Rose Plants (Fertilizer From Kitchen Waste) : गुलाब आणि जास्वंदाच्या झाडाला फुलंच येत नाही फक्त पानं वाढत जातात अशी अनेकांची तक्रार असते.

झाडं लावायला अनेकांना आवडते. (Fertilizer From Kitchen Waste) गार्डन असो किंवा बाल्कनी घराची शोभा वाढवण्यासाठी घरात झाडं लावली  जातात. खासकरून फुलंझाडं जास्तीत जास्त लावली जातात. (Gardening Tips and Tricks) अनेकदा जास्वंद, गुलाब, बांबू प्लांट, मनी प्लांट, तुळस ही झाडं लावली जातात. गुलाब आणि जास्वंदाच्या झाडाला फुलंच येत नाही फक्त पानं वाढत जातात अशी अनेकांची तक्रार असते. काही सोपे उपाय फुलांची वाढ होण्यास फायदेशीर ठरतील. (Best Fertilizer For Rose Plants)

केळीचे साल

तुम्ही केळी खाल्ल्यानंतर केळीचे सालं कचऱ्यात फेकून देत असाल तर असे करू नका. केळ्याच्या साली एक मग पाण्यात घालून २ दिवसांसाठी तसंच ठेवून त्यात नंतर हे पाणी गुलाबाच्या रोपात घाला. काही दिवसांतच गुलाबाच्या रोपाला फुलं येऊ लागतील.

तुरटी

एका भांड्यात एक चमचा तुरटी पाण्यात घालून मिसळा. रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी हे पाणी गुलाबाच्या रोपाला द्या. पाणी व्यवस्थित मुळांमध्ये शिरेल याची काळजी घ्या. काही दिवसांतच तुम्हाला चांगला रिलल्ट दिसून येईल.

घरातला बांबू प्लांट वाढवण्यासाठी ३ सोप्या टिप्स, एकही पान पिवळं पडणार नाही- प्लांट राहील हिरवेगार

कॉफी बीन्स

गुलाबाच्या रोपात तुम्ही कॉफी बीन्स घालू शकता. सगळ्यात आधी कॉफी बीन्सची पावडर तयार करा.  याचा तुम्ही खताच्या स्वरूपात वापर करू शकता.  नंतर ही पावडर तुम्ही हवीतशी वापरू शकता.यामुळे मुळांना पोषण मिळेल.

व्हाईट व्हिनेगर

व्हाईट व्हिनेगर रोपांच्या मुळांमध्ये तुम्ही खताप्रमाणे घाला. कोणत्याही लिक्विड खताबरोबर तुम्ही व्हाईट व्हिनेगर वापरू शकता. या उपायाने झाडांना भरपूर फुलं येतील. या खताचा वापर केल्याने  झाडांना फुलं भराभर येतील.

इतरांचा मनी प्लांट भरभर वाढतो, तुमचा वाढत नाही? किचनमधला ‘हा’ पदार्थ वापरा, मनी प्लांट होईल हिरवागार

गाईचे शेण

सर्वच रोपांसाठी गाईचे शेण बेस्ट असते.  सकाळच्यावेळी गुलाबाच्या रोपाची थोडी माती बाजूला घेऊन त्यात गाईचे शेण घालून उन्हात ठेवा. नंतर या रोपाला रोज पाणी देत राहा ज्यामुळे भरपूर पोषण मिळेल आणि भरपूर फुलं येतील.

अंड्याची सालं

जशी आपल्या शरीराला कॅल्शियमची आवश्यकता असते त्याचप्रमाणे झाडांनाही कॅल्शियम गरजेचे असते. अशावेळी तुम्ही अंड्याच्या सालीचा वापर करू शकता. अंड्याची सालं धुवून त्याची पावडर गुलाबाच्या रोपांत मातीत मिसळून घाला.  काही दिवसांत या रोपाला फुलं येतील.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स