Join us  

मनी प्लांटला द्या ३ प्रकारचं पाणी! छोट्याशा कुंडीतही भरपूर वाढेल, हिरवागार- भरगच्च दिसेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2024 4:26 PM

Best Home Made Fertilizer For Money Plant: मनी प्लांटची वाढ चांगली होत नसेल तर त्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा... (3 tips for the fast growth of money plant)

ठळक मुद्देमनीप्लांटसाठी सर्वोत्तम ठरणारं घरगुती खत कोणतं? आठवड्यातून एकदा हा उपाय करा....

मनी प्लांटचे अनेक वेगवेगळे प्रकार नर्सरीमध्ये मिळतात. ते आणून आपण आपल्या घरात हौसेने लावतो. कारण मनी प्लांट दिसायला तर छान दिसतेच, पण ते लकी प्लांटही मानले जाते. त्यामुळे ज्या काही लाेकांच्या घरात अगदी मोजकीच रोपं असतात, त्यांच्या घरातही मनी प्लांट हमखास असतोच. पण बऱ्याचदा असं होतं की मनीप्लांट चांगला वाढत नाही. त्याची पानं पिवळी होतात आणि गळून जातात (3 tips for the fast growth of money plant). त्यामुळे तो छान हिरवागार दिसत नाही. तुमच्याही मनीप्लांटच्या अशाच तक्रारी असतील तर हे काही घरगुती उपाय करून पाहा (best home made fertilizer for money plant). मनीप्लांट अतिशय जोमात वाढेल...(how to make money plant bushy and green?)

 

मनीप्लांटला कोणतं खत द्यावं?

मनीप्लांटसाठी सर्वोत्तम ठरणारं घरगुती खत कोणतं याविषयीची माहिती सांगणारा एक व्हिडिओ birendrasingh368 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी एकूण ३ प्रकारचं पाणी मनीप्लांटला द्या, असं सांगितलं आहे. ते नेमके कोणते ते पाहा..

मुलांना 'या' २ वेळांना अजिबात रागावू नका, तज्ज्ञ सांगतात मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो वाईट परिणाम

१. चहाचे पाणी

चहा गाळून घेतल्यानंतर भांड्यात, गाळणीमध्ये थोडी चहा पावडर राहतेच. त्यामध्ये थोडं पाणी टाका आणि ती पुन्हा उकळून घ्या. यानंतर ते पाणी थंड होऊ द्या. त्यानंतर ते मनी प्लांटच्या रोपावर शिंपडा आणि थोडं पाणी त्याच्या कुंडीतल्या मातीतही टाका. छान वाढ होईल. आठवड्यातून एकदा हा उपाय करा.

 

२. एप्सम साॅल्ट

एप्सम सॉल्टचा योग्य उपयोग करता आला तर ते तुमच्या झाडांसाठी एक खूप चांगलं खत ठरू शकतं. हा उपाय करण्यासाठी २ ग्रॅम एप्सम साॅल्ट अर्धा लीटर पाण्यामध्ये टाकून चांगलं विरघळून घ्या. त्यानंतर हे पाणी मनी प्लांटवर शिंपडा. पंधरा दिवसातून एकदा हा उपाय करू शकता.

मासिक पाळीत पोट खूप दुखतं? ६ योगासनं करा, काही मिनिटांतच आराम मिळेल- कंबरदुखीही थांबेल

३. राईस वॉटर

दररोज आपण भात लावण्यासाठी तांदूळ धुतो. तांदूळ धुतलेलं पाणी फेकून न देता मनीप्लांटला द्या.. त्यातले घटक मनीप्लांटसाठी खूप उपयुक्त ठरतात आणि प्लांट जोमाने वाढतं. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीगच्चीतली बाग