Join us  

गोकर्णाच्या वेलीला फुलंच येत नाहीत? चमचाभर तुरटीचा 'हा' उपाय करा, वेलीवर दिसतील फुलंच फुलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2024 12:31 PM

Gardening Tips For Aparajita Plant: गोकर्णाचा वेल नुसताच वाढत असेल, त्याला म्हणावी तशी फुलं येत नसतील तर हा एक सोपा उपाय करून पाहा...(best home remedies for getting maximum flowers from aparajita plant)

ठळक मुद्देशेंगा वाढत गेल्या की गोकर्णाच्या वेलीची वाढ खुंटते आणि तिला फुलं येण्याचं प्रमाणही खूप कमी होऊन जातं. 

गोकर्णाचा वेल असा असतो की त्याला खूप काळजी घेण्याची गरज नसते. तो अतिशय भराभर वाढतो. पण बऱ्याचदा असं होतं की वेल नुसताच वाढतो, पण त्याला म्हणावी तशी फुलं येतच नाहीत. अगदी आठवड्यातून कधीतरी क्वचित एखादे फुल येते. तुमच्याही घरच्या गोकर्णाची अवस्था अशीच असेल तर त्याला भरपूर प्रमाणात फुलं येण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा (remedies for the fast growth of gokarn plant). पांढरा किंवा जांभळा असा कोणत्याही रंगाचा गोकर्ण असेल तरी हा उपाय करता येईल.. काही दिवसांतच अगदी निळ्याशार किंवा पांढऱ्या फुलांनी गोकर्ण बहरून जाईल...(best home remedies for getting maximum flowers from aparajita plant)

 

गोकर्णाला भरपूर फुलं येण्यासाठी काय उपाय करावा?

गोकर्णाला भरपूर  फुलं येण्यासाठी काय उपाय करावा, याविषयी माहिती सांगणारा एक छानसा व्हिडिओ uniqfarming या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

मनी प्लांटला द्या ३ प्रकारचं पाणी! छोट्याशा कुंडीतही भरपूर वाढेल, हिरवागार- भरगच्च दिसेल...

यामध्ये असं सांगितलं आहे की ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार असाल त्याच्या आदल्या दिवशी गोकर्णाच्या कुंडीतली माती थोडी उकरून घ्या. जेणेकरून तुम्ही जे खास पाणी त्याला द्याल, ते थेट मुळांपर्यंत जाईल आणि आपण केलेल्या उपायाचा परिणाम अधिक जलद दिसून येईल. पण माती उकरताना मात्र त्याच्या मुळांना धक्का लागणार नाही, याची काळजी घ्या.

 

आता ३० ग्रॅम तुरटी घ्या आणि ती १ ग्लास पाण्यात विरघळायला ठेवा. अधूनमधून ती हलवत राहा. त्यानंतर साधारण २ ते ३ तासांनी तुरटी पाण्यात बऱ्यापैकी विरघळेल. आता हे पाणी गोकर्णाच्या वेलीला द्या. हा उपाय १५ ते २० दिवसांतून एकदा करा. काही दिवसांतच गोकर्णाला भरभरून फुलं आलेली दिसतील.

आठवड्यातून एकदा चेहऱ्याला लावा 'हा' खास बर्फ, टॅनिंग जाऊन त्वचेवर येईल मस्त सोनेरी ग्लो

गोकर्णाला जेव्हा फुलं येतं तेव्हा ते संध्याकाळी लगेच तोडून घ्या. नाहीतर मग तिथे शेंग तयार होते. शेंगा वाढत गेल्या की गोकर्णाच्या वेलीची वाढ खुंटते आणि तिला फुलं येण्याचं प्रमाणही खूप कमी होऊन जातं. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीगच्चीतली बाग