गणपती बाप्पाचे आवडते फुल म्हणजे जास्वंदाचे फुल (Hibiscus Plant). जास्वंदाचे फुल दिसायला आकर्षक आणि याचे अनेक फायदेही आहेत. जास्वंदाची फुलं आणण्यासाठी आपण बाजारात जातो (Homemade Fertilizer). पण बाजारात जाण्यापेक्षा आपण घरातही जास्वंदाचं झाड लावू शकतो (Gardening tips).
घरात जरी जास्वंदाचे झाड लावलं तरी त्याला मनासारखी फुलं येत नाही. कधीकधी कळीही फुलत नाही. जर जास्वंदाचे रोप भरपूर फुलांनी बहरावे असं वाटत असेल तर, ३ घरगुती गोष्टींनी खत तयार करा. या खतामुळे झाडाची उत्तम वाढही होईल, आणि झाडाला भरपूर फुलंही येतील(Best Homemade Fertilizer for Hibiscus ).
जास्वंदाचे झाड उत्तम फुलांनी बहरावे असं वाटत असेल तर..
- जास्वंदाच्या फुलांसाठी कोरफड, कांदा आणि लसूण फायदेशीर ठरू शकते. खतासाठी आपल्याला विशेष मार्केटमध्ये जाण्याची गरज नाही. कांदा, लसूण आणि कोरफडीचे नैसर्गिक खत घरात काही मिनिटात तयार होईल.
- सर्वात आधी लसणाच्या पाकळ्या, एक कोरफड आणि एक कांदा घ्या.
- या तीन गोष्टींचे सालासह लहान तुकडे करा. आता सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून पेस्ट तयार करा. एका भांड्यात १ लिटर पाणी घ्या. त्यात पेस्ट घालून मिसळा. अशा प्रकारे जास्वंदाच्या झाडासाठी नैसर्गिक खत तयार.
तेलकट पदार्थ खाणे बंद करूनही वजन घटेना? ' हे ' ४ तेल स्वयंपाकासाठी वापरा, वजन वाढणारच नाही
जास्वंदाच्या रोपाला खत घालण्याची पद्धत
- जास्वंदाच्या रोपाला भरपूर फुलं येण्यासाठी, कुंडीतील माती थोडी वेगळी करा. झाडाची मुळे दिसल्यानंतर त्यात खत घाला, त्यानंतर पुन्हा त्यावर माती घाला.
फ्रिजरमध्ये खूप बर्फ साचतो - पाणी गळतं? ३ सोपे उपाय; पैसे खर्च न करता प्रोब्लेम सुटेल
- या व्यतिरिक्त आपण तयार पाणी झाडांवरही फवारणी करू शकता. यामुळे झाडाला बुरशी लागणार नाही.
- या नैसर्गिक खतामुळे झाडाची योग्य वाढ होईल.