Join us

रोपांसाठी महागडं खत घेण्याची गरजच नाही! कांद्याचा 'या' पद्धतीने करा वापर- रोपं वाढतील भराभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2025 13:49 IST

Best Homemade Fertilizer For Plants: कांद्याची टरफलं वापरून रोपांसाठी अतिशय उत्तम दर्जाचं घरगुती खत कसं तयार करावं हे आपण पाहूया...(how to make fertilizer for plants using onion peel?)

ठळक मुद्देज्या रोपांची पानं पिवळी पडत आहेत किंवा जी रोपं खूप टवटवीत दिसत नाहीत अशा रोपांसाठी सुद्धा हे खत अतिशय गुणकारी ठरतं. 

आपल्या स्वयंपाक घरात बऱ्याच प्रमाणात सुका कचरा तयार होत असतो. तो कचरा जर योग्य प्रमाणात वापरला तर खरंतर आपल्या बागेतल्या रोपांसाठी तो एक अतिशय गुणकारी खत ठरू शकतो. पण बऱ्याचदा त्याचा चांगला उपयोग आपल्याला करून घेता येत नाही आणि आपण तो कचरा फेकून देतो (Best Homemade Fertilizer For Plants). म्हणूनच आता कांद्याच्या टरफलांचा वापर करून रोपांसाठी योग्य खत कसं तयार करायचं ते पाहूया..(how to make fertilizer for plants using onion peel?) 

 

कांद्याच्या टरफलांपासून रोपांसाठी खत कसं तयार करायचं?

जेव्हा जेव्हा कांदा स्वयंपाकासाठी वापरला जातो तेव्हा तो कापण्यापूर्वी आपण त्याची टरफलं वेगळी करतो. ही टरफलं एका बादलीमध्ये जमा करा.

'या' पद्धतीने सुकामेवा खाल तर पैसे वाया गेलेच म्हणून समजा! बघा योग्य पद्धत कोणती

तीन- चार दिवसांची टरफलं जमा करून तुम्ही त्याचं एकत्रित खत केलं तरी चालेल. आता जमा केलेली कांद्याची टरफलं एका भांड्यात टाका आणि ती टरफलं भिजतील एवढं पाणी त्यात टाकावं. त्यानंतर ३ ते ४ दिवस ही बादली तशीच झाकून ठेवा. नंतर ते पाणी गाळून घ्या आणि जेवढं पाणी असेल त्याच्या दहापट साधं पाणी त्यात टाका. 

 

आता हे झालं रोपांसाठी घरगुती खत तयार.. हे पाणी तुम्ही तुमच्या बागेतल्या सगळ्या रोपांना देऊ शकता. यामुळे रोपांना भरपूर प्रमाणात सल्फर मिळतं आणि त्यांची जोमाने वाढ होते.

दररोज किती भाजी आणि फळं खावी? वाचा माहिती आणि ठरवा तुमचं प्रमाण योग्य आहे का

ज्या रोपांना फुलं येत नाहीत त्यांना भरभरून फुलं येण्यासाठी हा एक सगळ्यात स्वस्तात मस्त उपाय आहे. कांद्याचं पाणी जर तुम्ही नियमितपणे फुलझाडांना दिलं तर त्यांच्यावर नेहमीच टवटवीत फुलं फुललेली दिसतील. ज्या रोपांची वाढ खुंटली आहे, ज्या रोपांची पानं पिवळी पडत आहेत किंवा जी रोपं खूप टवटवीत दिसत नाहीत अशा रोपांसाठी सुद्धा हे पाणी अतिशय गुणकारी ठरतं. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीगच्चीतली बागकांदा