Lokmat Sakhi >Gardening > कावळे-कबुतर कुंडीतील रोपांची नासधूस करतात? करा एक भन्नाट घरगुती युक्ती, रोपं राहतील सुरक्षित...

कावळे-कबुतर कुंडीतील रोपांची नासधूस करतात? करा एक भन्नाट घरगुती युक्ती, रोपं राहतील सुरक्षित...

गार्डन - बाल्कनीमधील रोपांचा कावळे - कबुतरांपासून बचाव करण्यासाठीची ही खास ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2024 07:53 AM2024-10-16T07:53:13+5:302024-10-23T14:34:43+5:30

गार्डन - बाल्कनीमधील रोपांचा कावळे - कबुतरांपासून बचाव करण्यासाठीची ही खास ट्रिक...

Best Ways to Protect Your Plants from Birds Keep Birds Off Fruit Trees And Gardens With This Simple Trick How to Keep Birds Out of Your Garden 1 Simple Way to Keep Birds Away | कावळे-कबुतर कुंडीतील रोपांची नासधूस करतात? करा एक भन्नाट घरगुती युक्ती, रोपं राहतील सुरक्षित...

कावळे-कबुतर कुंडीतील रोपांची नासधूस करतात? करा एक भन्नाट घरगुती युक्ती, रोपं राहतील सुरक्षित...

आपण बाल्कनीत लावलेल्या रोपांची खूपच काळजी घेतो. सहसा आपण बघतो की आपल्या घराला गॅलरी असली की अनेक पक्षी, किटक या गॅलरीत येऊन बसतात. कबुतर हा पक्षी त्यापैकीच एक आहे.  कबूतर आणि कावळे आपल्या रोपांची नासधूस ( 1 Simple Way to Keep Birds Away) करतात. गॅलरीत येऊन विष्ठा करुन आपली गॅलरी तर घाण करतातच, पण यासोबत आपण मेहेनतीने लावलेल्या रोपांचे नुकसान करतात( How to Keep Birds Out of Your Garden).

 कबुतर काहीवेळा शांत सावलीसाठी आपल्या घराच्या बाल्कनीत असणाऱ्या कुंड्यांमध्ये येऊन बसते. परंतु कबुतर या बाल्कनीत रोपांची पाने किंवा रोपं आपल्या चोचीने चावून, कुंडीतील माती उकरुन त्यांचे नुकसान करतात. कबुतरांपासून रोपांचे संरक्षण करण्यासाठी आपण एक खास ट्रिक वापरु शकतो(Best Ways to Protect Your Plants from Birds).

कुंडीतल्या रोपांची माती बदलण्याची वेळ झाली कसं ओळखाल? लक्षात ठेवा २ गोष्टी-पाहा योग्य पद्धत...

बाल्कनीत येणाऱ्या कबुतरांपासून रोपांचे संरक्षण कसे करावे ? 

1. आपल्याला एक प्लॅस्टिकची काळ्या रंगाची थोडी आकाराने मोठी अशी पिशवी आणि जुने रद्दीचे कागद लागणार आहेत.
2. एक प्लॅस्टिकची काळ्या रंगाची मोठी पिशवी घेऊन त्यात जुन्या रद्दीच्या कागदांचे मोठे गोलाकार गोळे तयार करून घालावेत. त्यानंतर या पिशवीत थोडी हवा राहील अशी थोडी फुलवून मग गाठ बांधून घ्यावी.
3. आता ही पिशवी आपल्या गार्डन किंवा बाल्कनीत रोपांच्या जवळच पण थोडी दिसेल अशी वर लटकवून ठेवावी. सतत येणाऱ्या हवेमुळे ही हलकी - फुलकी पिशवी सतत हलत राहील.
4. या काळ्या रंगाच्या सतत हलणाऱ्या पिशवीला घाबरुन कबूतर किंवा इतर पक्षी रोपांच्या जवळपास फिरकत  नाहीत. ही साधीसोपी ट्रिक वापरुन आपण बाल्कनी किंवा गार्डनमधील रोपांचे कबूतर किंवा इतर पक्ष्यांमुळे होणारे नुकसान थांबवू शकतो.

कोरफडीचं रोप उन्हात ठेवणं योग्य की अयोग्य? काय केलं तर कोरफड वाढेल जोमानं...


Web Title: Best Ways to Protect Your Plants from Birds Keep Birds Off Fruit Trees And Gardens With This Simple Trick How to Keep Birds Out of Your Garden 1 Simple Way to Keep Birds Away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.