Join us  

कावळे-कबुतर कुंडीतील रोपांची नासधूस करतात? करा एक भन्नाट घरगुती युक्ती, रोपं राहतील सुरक्षित...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2024 7:53 AM

Best Ways to Protect Your Plants from Birds : Keep Birds Off Fruit Trees And Gardens With This Simple Trick : How to Keep Birds Out of Your Garden : 1 Simple Way to Keep Birds Away : गार्डन - बाल्कनीमधील रोपांचा कावळे - कबुतरांपासून बचाव करण्यासाठीची ही खास ट्रिक...

आपण बाल्कनीत लावलेल्या रोपांची खूपच काळजी घेतो. सहसा आपण बघतो की आपल्या घराला गॅलरी असली की अनेक पक्षी, किटक या गॅलरीत येऊन बसतात. कबुतर हा पक्षी त्यापैकीच एक आहे. आपल्या गार्डन - बाल्कनी मध्ये असणाऱ्या रोपांवर काहीवेळा कावळे आणि कबूतर येऊन बसतात. कबूतर आणि कावळे आपल्या रोपांची नासधूस ( 1 Simple Way to Keep Birds Away) करतात. एक नाही तर कधी असे अनेक पक्षी एकदम येऊन रोपांची विलेवाट लावतात. हे पक्षी आपण लावलेल्या रोपांच्या कुंड्यांमध्ये घर करुन राहतात. काहीवेळा आपण काही दिवसांसाठी घरी नसलो की गॅलरीत येणाऱ्या या पक्ष्यांना बिनधास्तपणे वावरता येत. मग हे पक्षी गॅलरीत येऊन विष्ठा करुन आपली गॅलरी तर घाण करतातच, पण यासोबत आपण मेहेनतीने लावलेल्या रोपांचे नुकसान करतात( How to Keep Birds Out of Your Garden).

 कबुतर काहीवेळा शांत सावलीसाठी आपल्या घराच्या बाल्कनीत असणाऱ्या कुंड्यांमध्ये येऊन बसते. परंतु कबुतर या बाल्कनीत रोपांची पाने किंवा रोपं आपल्या चोचीने चावून, कुंडीतील माती उकरुन त्यांचे नुकसान करतात. अशावेळी आपण फार मेहेनत घेऊन लावलेली ही रोपं कोमेजून गेल्यावर आपला हिरमोड होतो. यासाठीच बाल्कनीत लावलेल्या रोपांचा कबुतर आणि इतर (Keep Birds Off Fruit Trees And Gardens With This Simple Trick) पक्ष्यांपासून बचाव करण्यासाठी आपण नेहमीच वेगवेगळे उपाय करुन पाहत असतो. कबुतर बाल्कनीत आले की आपण त्यांना हकलवून (1 Simple Way to Keep Birds Away) देतो. कबुतरांनी आपल्या बाल्कनीतल्या रोपांची नासधूस करु नये म्हणून आपण रोपांची अनेक प्रकारे काळजी घेतो. वारंवार बाल्कनीत येणाऱ्या कबुतरांपासून रोपांचे संरक्षण करण्यासाठी आपण एक खास ट्रिक वापरु शकतो(Best Ways to Protect Your Plants from Birds).

बाल्कनीत येणाऱ्या कबुतरांपासून रोपांचे संरक्षण कसे करावे ? 

आपल्या बाल्कनीत असणाऱ्या रोपांवर वारंवार कबूतर येऊन बसतात. एवढेच नाही तर हे कबूतर या रोपांना इजा पोहचवून त्यांची नासधूस करतात. अशावेळी आपण कबुतरांना हाकलवून लावतो खरे, पण ही कबुतर सारखी येऊन रोपांचे नुकसान करतात. अशा परिस्थिती कबुतरांना पळवून लावण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करून पाहतो. परंतु आपण एक सहजसोपी ट्रिक वापरुन देखील या कबुतरांना पळवून लावू शकतो. 

कुंडीतल्या रोपांची माती बदलण्याची वेळ झाली कसं ओळखाल? लक्षात ठेवा २ गोष्टी-पाहा योग्य पद्धत...

यासाठी आपल्याला एक प्लॅस्टिकची काळ्या रंगाची थोडी आकाराने मोठी अशी पिशवी आणि जुने रद्दीचे कागद लागणार आहेत. एक प्लॅस्टिकची काळ्या रंगाची मोठी पिशवी घेऊन त्यात जुन्या रद्दीच्या कागदांचे मोठे गोलाकार गोळे तयार करून घालावेत. त्यानंतर या पिशवीत थोडी हवा राहील अशी थोडी फुलवून मग गाठ बांधून घ्यावी. आता ही पिशवी आपल्या गार्डन किंवा बाल्कनीत रोपांच्या जवळच पण थोडी दिसेल अशी वर लटकवून ठेवावी. सतत येणाऱ्या हवेमुळे ही हलकी - फुलकी पिशवी सतत हलत राहील. परिणामी, या काळ्या रंगाच्या सतत हलणाऱ्या पिशवीला घाबरुन कबूतर किंवा इतर पक्षी रोपांच्या जवळपास फिरकत देखील नाहीत, यामुळे आपल्या रोपांचे रक्षण केले जाते. ही साधीसोपी ट्रिक वापरुन आपण बाल्कनी किंवा गार्डनमधील रोपांचे कबूतर किंवा इतर पक्ष्यांमुळे होणारे नुकसान थांबवू शकतो.

कोरफडीचं रोप उन्हात ठेवणं योग्य की अयोग्य? काय केलं तर कोरफड वाढेल जोमानं...

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स