प्रत्येकाच्या घरात एक तरी रोप असतेच. काही लोक घरात छोटंसं गार्डन तयार करतात (Gardening Tips). छोट्या झाडांमुळे घराची शोभा वाढते. उन्हाळ्यात रोप सुकते, किंवा रोपांना व्यवस्थित पाणी मिळत नाही (Buttermilk). ज्यामुळे रोपांची पानं पिवळी पडतात (Green Leaf). तर कधी पानांवर कीड आणि बुरशी तयार होते. ज्यामुळे चांगली झाडं, आपल्याकडून नकळत घडणाऱ्या चुकांमुळे खराब होतात. वाढ खुंटते, आणि पानं गळू लागतात.
बाजारात अनेक प्रकारचे रसायनयुक्त फर्टिलायजर्स मिळतात. पण यामुळे झाडं आणखीन खराब होऊ शकतात. जर झाडांची नैसर्गिक वाढ व्हावी असे वाटत असेल तर, त्यात ताक मिसळा. ताकामुळे मानवी शरीराला फायदा होतो. त्याचप्रमाणे झाडांनाही होतो. फक्त पाणी आणि सूर्यप्रकाश नसून, ताकामुळेही झाडांना फायदा होईल(Buttermilk Spray for Pest control and Plant growth).
कुंडीतल्या मातीत ताक मिसळण्याचे फायदे
बुरशीजन्य संसर्गापासून सुटका
दह्याची चव आंबट असते. त्यातील गुणधर्म शरीरासह झाडांसाठीही फायदेशीर ठरते. झाडांच्या पानांवर ताक फवारल्याने पानांवर बुरशीजन्य संसर्ग तयार होत नाही. शिवाय कीडही फिरकत नाही. अनेकदा हिरवी मिरची आणि जास्वंदाच्या झाडांवर मुंग्या किंवा बुरशीजन्य संसर्गास बळी पडतात. त्यामुळे झाडांवर ताकाची फवारणी करा. झाड सुरक्षित राहील.
झाडांच्या वाढीसाठी बेस्ट
सूर्यप्रकाश आणि पोषणअभावी झाडांची वाढ खुंटते. यावर आपण ताकाचा वापर करून पाहू शकता. यासाठी पाण्यात ताक मिसळा. मातीमध्ये ताकाचं पाणी मिक्स करा. यामुळे झाडाची योग्य वाढ होईल.
बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारे ५ पदार्थ, हृदय ठेवा ठणठणीत-रक्ताभिसरणही सुधारेल
पानं पिवळी पडणार नाही
जास्वंद असो किंवा अन्य; अनेक झाडांची पानं पिवळी पडतात किंवा कोमेजतात. अशावेळी कुंडीतल्या झाडाची वाढ खुंटते. अशावेळी झाडांवर ताकाची फवारणी करण्यासोबत, झाडांच्या मुळांमध्येही ताकाचे पाणी घाला. यामुळे झाडांची योग्य वाढ होईल.