प्रत्येकाच्या घरात एक ना एक रोप असतं. (Gardning Tips) काहीजणांना घरात फुलझाड ठेवण्याची आवड असते तर काहीजण अंगणात किंवा गॅलरीत फक्त तुळशीचे रोप ठेवतात. ऊन्हाळ्याच्या दिवसांत रोप सुकते किंवा रोपांना पानं व्यवस्थित येत नाहीत आलेली पानं पिवळी पडतात. (Buttermilk Sprey For Plants Growth And Pest Control) तर कधी रोपांवर किटक होतात. बाजारात मिळणाऱ्या केमिकल्सयुक्त फर्टिलायजर्सचा वापर करून तुम्ही झाडांना लागलेली किड काढू शकता. (How to Use Buttermilk For Plants Growth)
घरच्याघरी फर्टिलायजर बनवणं खूपच सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला अजिबात खर्च करावा लागणार नाही. (How To Grow Plants In Home) पाण्यात ताक आणि काही पदार्थ मिसळून एक द्रावण तयार करून घ्या. ताकात कॅल्शियम, फॉस्फरेस, पोटॅशियम सारखी पोषक तत्व असतात. हे पाणी गार्डनमध्ये फवारल्याने रोपं नेहमी बहरलेलं राहतं.
रोपांच्या चांगल्या वाढीसाठी घरगुती खत कसं तयार करायचे?
१) ताक- १ ग्लास
२) नारळपाणी - १ ग्लास
३) फळांचा रस - १ ग्लास
४) हळद- १ चमचा
५) हिंग- अर्धा छोटा चमचा
६) पाणी- १ लिटर
खत तयार करण्याची योग्य पद्धत (Buttermilk For Plants)
ताकाचं खत तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात ताक, नारळ पाणी, हळद, हिंग, फळांचा रस मिक्स करा. हे पदार्थ व्यवस्थित मिसळून पाण्यात एकजीव करा. हवंतर तुम्ही एका पाण्याच्या माठात हे द्रावण घालू शकता. नंतर या खताचा वापर करा.
ताकाचे द्रावण रोपात घातल्याने कोणते फायदे मिळतात
1) रोपात हे पाणी घातल्याने झाडांवर लागलेली बुरशी आणि किटक दूर होतील. झाडाची वाढ थांबली असेल तर हे नैसर्गिक खताचे पाणी घातल्याने झाडांची वाढ भराभर होईल. ताकात असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे रोपांच्या वाढीस चालना मिळते. फुल झाडांना जर फुलं येत नसतील तर या मिश्रणाने झाडांची वाढ चांगली होईल. गार्डनची पानं पिवळी होत असेल तर या उपायाने पानं चांगली राहतील.
2) ताकाचा वापर रोपांमध्ये केल्याने रोपाची रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. यातील बॅक्टेरिया रोपांचे किटकांपासून होणारे नुकसान टाळण्यास फायदेशीर ठरते. ज्यामुळे झाडांची चांगली वाढ होते. बॅक्टेरियांचा प्रभाव कमी होतो. फुलंपण येतात. रोपाची मुळं मजबूत होतात आणि कॅल्शियम, पोटॅशिमयसारखी पोषक तत्व रोपाला मिळतात.