Lokmat Sakhi >Gardening > नर्सरीत हिरवीगार-फुललेली रोपं घरी आणलं की कोमेजतात? ५ चुका टाळा-पाहा फुलंच फुलं...

नर्सरीत हिरवीगार-फुललेली रोपं घरी आणलं की कोमेजतात? ५ चुका टाळा-पाहा फुलंच फुलं...

Common Mistakes To Avoid After Bringing Your Plant Home From Nursery : What to do after bringing plants from nursery : How to care for new plants you order from nursery : नर्सरीत सुंदर फुलांनी लगडलेली रोपं घरी आणून लावली की अनेकदा कोमेजून का जातात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2024 08:16 AM2024-10-03T08:16:14+5:302024-10-03T08:33:29+5:30

Common Mistakes To Avoid After Bringing Your Plant Home From Nursery : What to do after bringing plants from nursery : How to care for new plants you order from nursery : नर्सरीत सुंदर फुलांनी लगडलेली रोपं घरी आणून लावली की अनेकदा कोमेजून का जातात?

Common Mistakes To Avoid After Bringing Your Plant Home From Nursery What to do after bringing plants from nursery How to care for new plants you order from Nursery | नर्सरीत हिरवीगार-फुललेली रोपं घरी आणलं की कोमेजतात? ५ चुका टाळा-पाहा फुलंच फुलं...

नर्सरीत हिरवीगार-फुललेली रोपं घरी आणलं की कोमेजतात? ५ चुका टाळा-पाहा फुलंच फुलं...

आपल्या घराची बाल्कनी किंवा गार्डन सजवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची रोपं लावतो. ही रोपं शक्यतो आपण घराजवळच्याच एखाद्या नर्सरीमधून आणतो. नर्सरीमध्ये रोपं आणायला गेल्यावर तिथली हिरवीगार, फुला -फळांनी लगडलेली रोपं, झाड बघून आनंद होतोच. नर्सरी मधील वेगवेगळ्या प्रकारची हिरवीगार रोपं, झाड बघून ही सगळीच रोपं आपल्या बाल्कनीत असावी असा मोह होतो. नर्सरीतील कुठले रोपं घ्यावे आणि कुठले घेऊ नये अशी द्विदा मनस्थिती होते. शेवटी आपण आपल्याला आवडलेली काही रोपं घरी आणतो(some common mistakes to avoid when caring for a plant you've brought home from the nursery).

आपल्यापैकी बऱ्याचजणांनी अनुभवले असेल की नर्सरीमध्ये असताना हिरवीगार, फळाफुलांचा बहर आलेली ही रोपं घरी आणल्यावर कोमेजून जातात. नर्सरीमध्ये असताना ही रोपं छान तरतरीत, हिरवीगार दिसतं असल्याने आपण मोठ्या आवडीने (What to do after bringing plants from nursery) ती विकत घेतो. परंतु हीच रोपं घरी आणून कुंडीत लावल्यानंतर ती कोमेजतात, सुकतात. काहीवेळा तर या रोपांना फळं - फुलं येणंही बंद होते. अशावेळी नेमके काय करावे सुचत नाही. खरंतर नर्सरी मधून रोपं घरी आणल्यानंतर आपण काही चुका करतो, या चुकांमुळेच रोपं कोमेजून जातात. या चुका नेमक्या कोणत्या ते पाहूयात(How to care for new plants you order from Nursery).

नर्सरीमधून आणलेलं रोपं कुंडीत लावताना लक्षात ठेवा... 

१. बहुतेकवेळा नर्सरीमध्ये विकली जाणारी रोपं,झाडं ही बहुतांशी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येच लावलेली असतात. साधारणतः आपण पाहिले असेल की नर्सरीमध्ये काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ही रोपं लावलेली असतात. आपण ही रोपं घरी आणून ती माती किंवा प्लास्टिकच्या कुंड्यांमध्ये लावतो. परंतु ही रोपं नर्सरीमधून आणल्यानंतर लगेच ती कुंड्यांमध्ये लावण्याची चूक करु नका. ही रोपं नर्सरीमधून आणल्यानंतर किमान ४ ते ५ दिवसानंतर कुंडीत लावावीत. बरेचदा रोपं बदललेल्या वातावरणाशी लगेच जुळवून घेऊ शकत नाहीत त्यामुळे ती सुकतात किंवा कोमेजून जातात. 

कोरफडीचं रोप उन्हात ठेवणं योग्य की अयोग्य? काय केलं तर कोरफड वाढेल जोमानं...

२. जेव्हा तुम्ही ही रोपं कुंडीत लावाल तेव्हा विषेश काळजी घ्यावी. प्लास्टिकच्या पिशव्यांमधून ही रोपं बाहेर काढताना त्यांच्या मुळांना इजा होणार नाही किंवा ती तुटणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी. असे न केल्यास रोपं कोमेजतात. जेव्हा तुम्ही कुंडीत रोप लावाल तेव्हा बाहेरील प्लास्टिकची पिशवी काळजीपूर्वक फाडून टाका. रोपं कुंडीत लावल्यानंतर ७ ते ८ दिवसांनी त्यांना हलका सूर्यप्रकाश आणि सावली मिळेल अशा ठिकाणी ठेवा.     

३. नर्सरी मधून आणलेली रोपं कुंडीत लावताना योग्य कुंडीची निवड करा. रोपं कुंडीत लावताना रोपापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचीच कुंडी पाहावी, जेणेकरुन मुळांना वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळेल. नर्सरी मधून जर तुम्ही मध्यम साईजचे रोपं आणले असेल तर थोड्या मोठ्याच कुंडीची निवड करा, कारण थोड्या दिवसांतच हे रोपं मोठे होणार असल्याने ते पुन्हा दुसऱ्या कुंडीत लावण्याची गरज लगेच भासू नये. रोपं सारखे एका कुंडीतून दुसऱ्या कुंडीत लावले तर वारंवार त्यांना हाताळल्याने त्यांच्या मुळांना इजा पोहोचू शकते. 

भाजलेल्या शेंगदाण्याची टरफलं फेकून देण्यापेक्षा बाल्कनीतील रोपांसाठी करा खास खत, रोपं येतील बहरुन...

४. रोपासाठी नेमकी कोणत्या प्रकारची माती लागते ते नीट तपासून घ्या. वेगवेगळ्या प्रकारच्या रोपांना वेगवेगळ्या मातीची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत, जेव्हाही तुम्ही एखादे रोप विकत घ्याल तेव्हा या रोपासाठी कोणत्या प्रकारची माती योग्य असेल हे नक्कीच त्या नर्सरीमधील माळीला विचारा. याशिवाय झाडे नेहमी नरम असणाऱ्या मातीतच लावा कारण कठिण मातीमुळे झाडांच्या मुळांची वाढ होण्यास त्यांना पुरेशा प्रमाणांत पसरण्यास अडचण निर्माण होऊ शकते. 

तुळशीच्या पानांना किड लागली करा ४ सोपे उपाय, तुळस पुन्हा येईल नव्यासारखी बहरुन...

५. नर्सरी मधून रोपं आणल्यानंतर त्या रोपाला कोणत्या प्रकारचे खत किंवा फवारणी लागते याची योग्य माहिती काढा. काही ठराविक काळानंतर वेळोवेळी या रोपांना खत देत रहा. आवश्यक असल्यास किटकनाशक किंवा औषधांची फवारणी देखील करा. जर आपल्याला योग्य माहिती नसेल तर रोपण हार्श होतील अशी खत, किटकनाशक यांचा वापर टाळा, शक्यतो सौम्य खत आणि किटकनाशकांची निवड करावी.    

         

Web Title: Common Mistakes To Avoid After Bringing Your Plant Home From Nursery What to do after bringing plants from nursery How to care for new plants you order from Nursery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.