Lokmat Sakhi >Gardening > घराच्या बाल्कनीत लावा ३ प्रकारची झाडं; २४ तास मिळेल ऑक्सिजन-हवाही राहील खेळती..

घराच्या बाल्कनीत लावा ३ प्रकारची झाडं; २४ तास मिळेल ऑक्सिजन-हवाही राहील खेळती..

Do you know plants that give oxygen 24 hours : घरात फक्त ३ इनडोअर प्लांट लावयला विसरू नका-घर राहील प्रसन्न आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2024 05:13 PM2024-02-23T17:13:45+5:302024-02-23T17:15:06+5:30

Do you know plants that give oxygen 24 hours : घरात फक्त ३ इनडोअर प्लांट लावयला विसरू नका-घर राहील प्रसन्न आणि..

Do you know plants that give oxygen 24 hours? | घराच्या बाल्कनीत लावा ३ प्रकारची झाडं; २४ तास मिळेल ऑक्सिजन-हवाही राहील खेळती..

घराच्या बाल्कनीत लावा ३ प्रकारची झाडं; २४ तास मिळेल ऑक्सिजन-हवाही राहील खेळती..

झाडं आहेत तर आपलं जीवन आहे. जगण्यासाठी झाड जगवणे गरजेचं आहे. झाडाचा फायदा प्रत्येकाला होतो. झाडाची पानं, फुलं, फळे, यासह त्यामधून मिळणारे ऑक्सीजन मानवास जगण्यासाठी आवश्यक आहे. वाढत्या प्रदुषणामुळे अनेकांना शुद्ध हवा मिळत नाही. अशुद्ध हवेमुळे आपल्या शरीराला गंभीर आजारांचा विळखा बसतो (Oxygen). त्यामुळे बरेच जण घरातल्या बाल्कनीतच छोटीशी गार्डन तयार करतात.

काही जण तुळस, गुलाब किंवा इतर रोप लावतात. पण रोपातून ऑक्सिजन मिळावे यासाठी घरात कोणते रोपटे लावावे? याची माहिती फार कमी लोकांना आहे (Gardening Tips). घरात शुद्ध हवा खेळती राहावी यासाठी बाल्कनीत कोणते रोपटे लावावे? पाहूयात(Do you know plants that give oxygen 24 hours).

स्नेक प्लांट

जर आपल्याला घराची शोभा आणि घरात शुद्ध हवा खेळती राहावी असे वाटत असेल तर, घरामध्ये स्नेक प्लांट ठेवा. स्नेक प्लांट दिसायला आकर्षक आणि सुंदर दिसतात. मुख्य म्हणजे हे झाड एअर फिल्टर म्हणून काम करते. रात्रीच्या वेळेस हे झाड कार्बन डायऑक्साईडचे बदल ऑक्सिजनमध्ये करते. त्यामुळे हवा शुद्ध होते. शुद्ध हवेसाठी आपण हे रोपटे घरात लावू शकता.

लिंबाच्या झाडाला लिंबूच नाही? मातीत मिसळा फुकट मिळणाऱ्या २ गोष्ट; पिवळ्या धमक लिंबूने बहरेल रोपटं

एलोवेरा प्लांट

एलोवेराला हाउस प्लांट म्हणून ओळखले जाते. एलोवेराचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. शिवाय याचा मुख्य वापर त्वचा आणि केसांसाठी होतो. पण याव्यतिरिक्त हे झाड हवा शुद्ध करून ऑक्सिजन सोडते. हे झाड ॲल्डिहाइड आणि बेंझिन सारखे विषारी पदार्थ देखील शोषून घेते. म्हणूनच या झाडाला सुपर प्लांट म्हणून ओळखले जाते.

मातीत मिसळा फक्त ३ गोष्टी, कुंडीत लावलेले कडीपत्त्याचे झाडही होईल मोठे-पानं होतील सुगंधी

मनी प्लांट

बऱ्याच घरांमध्ये मनी प्लांट आढळते. मनी प्लांटमुळे बाल्कनी खूप सुंदर आणि आकर्षक दिसते. पण याचे फायदे देखील अनेक आहेत. मनी प्लांटची पाने हवेतील विषारी द्रव्ये शोषून घेतात. शिवाय २४ तास हवेत ऑक्सिजन सोडतात. त्यामुळे घराच्या बाल्कनीमध्ये एक मनी प्लांट लावाच.

Web Title: Do you know plants that give oxygen 24 hours?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.