Join us  

अक्रोड खाता आणि कवच फेकून देता? कुंडीतल्या रोपांसाठी करा खत, पाहा सोपी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2024 4:20 PM

Easy Fertilizer made from walnut shells gardening tips : अक्रोडमध्ये ज्याप्रमाणे व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात त्याचप्रमाणे कवचामध्येही याचे प्रमाण चांगले असते.

आक्रोड हा सुकामेव्यातील एक अतिशय महत्त्वाचा घटक. मेंदूच्या आकाराचा दिसणारा हा आक्रोड मेंदू तल्लख होण्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. त्यामुळे गर्भवती महिला, लहान मुले यांना आवर्जून आक्रोड खाण्याचा सल्ला दिला जातो. आक्रोडामध्ये ओमेगा ३, व्हिटॅमिन्स, खनिजे आणि इतरही बरेच आवश्यक घटक असतात. त्यामुळे तो खाल्ल्याने शरीराला विविध घटक मिळण्यास मदत होते. बरेचदा आपण सालासहीत असलेला आक्रोड आणतो आणि घरी फोडून आतला मगज खातो. यावर असलेले कवच अतिशय टणक असल्याने ते फोडण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात (Easy Fertilizer made from walnut shells  gardening tips). 

आक्रोड फोडले की हे कवच सहसा कचरा म्हणून आपण फेकून देतो. पण आक्रोडाचे हे कवच रोपांना खत बनवण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. आपल्या होम गार्डनमध्ये इनडोअर आणि आऊटडोअर अशी बरीच रोपं असतात. या रोपांची काहीवेळा अचानक वाढ खुंटते किंवा पानं मलूल होतात. पण असं होऊ नये आणि रोपं कायम हिरवीगार बहरलेली दिसावीत यासाठी या आक्रोडाच्या कवचांपासून केलेल्या खताचा अतिशय चांगला फायदा होतो. इतक्या कडक असलेल्या या कवचापासून खत नेमकं कसं तयार करायचं पाहूया...

(Image : Google)

१. आक्रोडामध्ये ज्याप्रमाणे व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात त्याचप्रमाणे कवचामध्येही याचे प्रमाण चांगले असते. साधारण २ लिटर पाणी घेऊन त्यात ही आक्रोडाची कवच घालून ते गॅसवर उकळायला ठेवायचे. 

२. साधारण १५ ते २० मिनीटे हे कवचाचे पाणी चांगले उकळायचे, मग पाण्याचा रंग बदलतो आणि हे पाणी लालसर रंगाचे दिसायला लागते. 

३. हे गडद रंगाचे झालेले पाणी साधारण ४ लीटर पाणी घेऊन त्यात गाळायचे. 

४. हे आक्रोडाच्या कवचाचे पाणी रोपांना घालण्यासाठी आणि त्यांच्या पानांवर फवारण्यासाठी वापरावे. 

५. यामुळे रोपांमधील गेलेला जीव पुन्हा येण्यास आणि रोपं मस्त हिरवीगार दिसण्यास मदत होते.   

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सहोम रेमेडी