मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध खूपच खास आणि वेगळा असतो. कोणताही सण असो किंवा सामान्य दिवस मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध घराला आनंद देतो. (Gardening Tips) मोगऱ्याची फुलांचा गजरा खूपच खास असतो. घरात मोगऱ्याचं झाड लावलं आणि त्याला फुलं आली नाहीत सर्व मेहनत वाया जाते. मोगऱ्याची काळजी घेतली तर सुगंध चांगला येईल आणि घराचीही शोभा वाढेल. (How to Grow Mogra Plant At Home)
घरात मोगऱ्याची फुलं कशी उगवावीत? (How to Grow Mogra Plant)
मोगऱ्याच्या रोपाला भरपूर फुलं येण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. रोप कधीच प्लास्टीकच्या कुडींत लावू नये. मोगऱ्याची रोपं मातीच्या कुंडीत लावा. ज्यामुळे मोगरा चांगला फुलेल. मोगऱ्याचे रोप जर तुम्ही प्लास्टीकच्या कुडींत लावले तर उन्हात प्लास्टीक जास्त गरम होईल आणि रोपांचे नुकसान होऊ शकते.
नसांमधलं घातक युरिक एसिड बाहेर निघेल; रोज १ तमालपत्र 'या' पद्धतीने खा-नसा होतील स्वच्छ
मोगऱ्याचं रोप कुठे ठेवावे? (Right Place To Keep Mogra Plant)
मोगऱ्याचं रोप उन्हात लावणं गरजेचं आहे. कमीत कमी ५ ते ६ तासांसाठी मोगऱ्याचे रोप उन्हात ठेवा. ज्यामुळे फुलं चांगली फुलतील. मोगऱ्याला पोषण मिळण्यासाठी खत घालणं गरजेचं आहे. या खतात ५० टक्के गाईच्या शेणाचा समावेश असायला हवा.
मोगऱ्याच्या पोषणासाठी एप्सम सॉल्ट उत्तम पर्याय आहे. कमीत कमी २ लिटर पाण्यात एक चमचा एप्सम सॉल्ट व्यवस्थित मिसळा. हे मिश्रण मोगऱ्याच्या झाडावर स्प्रे करा. मोगऱ्याच्या रोपाला पुरेसं पाणी घाला.
ना सोडा, ना लिंबू ३ मिनिटांत घरीच करा परफेक्ट ढोकळा; मऊ-फुललेल्या ढोकळ्याची सोपी रेसिपी
मोगऱ्याच्या रोपासाठी महत्वाचे न्युट्रिएंट्स
मोगऱ्याला महिन्यातून एकदा खत घाला. याशिवाय मोगरा लावताना कुंडी भराल तेव्हाच त्यात जे ५० टक्के शेणखत, १२ टक्के रेती आणि १० टक्के कोकोपीट, गार्डन सॉईलचा समावेश करा.