Join us  

कुंडीतल्या रोपांना बहर येण्यासाठी १ सोपा उपाय, बाग होईल हिरवीगार-फुलतील रंगबिरंगी फुलं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2023 11:49 AM

Easy home made pesticide for blooming plants : २ पदार्थांपासून तयार होणारे हे किटकनाशक कसे करायचे पाहूया...

घर सजवण्यासाठी आपण वेगवेगळे शो पीस, चांगले पडदे, उश्या, वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम्स असे काही ना काही आणतो. काही काळाने या गोष्टी जुन्या झाल्या की घराचा लूक बदलण्यासाठी आपण या गोष्टींमध्ये बदल करतो. घर सजवण्यासाठी हल्ली घरांमध्ये आणखी एक गोष्ट आवर्जून केली जाते ती म्हणजे घराच्या बाल्कनीत किंवा खिडक्यांमध्ये, घराच्या आत लावली जाणारी विविध प्रकारची रोपं. ही रोपं फुलांची, शोभेची असल्याने घराच्या सौंदर्यात त्यामुळे भरच पडत असते. ही रोपं मस्त फुललेली असतील तर छान दिसतात पण ती कोमेजलेली, पानं पिवळी पडलेली-सुकलेली असतील तर मात्र त्या रोपांना काहीच अर्थ नसतो (Easy home made pesticide for blooming plants) .  

रोपांना रंगबिरंगी फुले आलेली असतील तर त्यामुळे घराची शोभा वाढण्यास मदत होते. पण काहीवेळी पुरेसे पोषण न मिळाल्याने, ऊन-वारा न मिळाल्याने किंवा कधी किड लागल्याने ही रोपं कोमेजतात. रोपं कायम सदाबहार राहावीत यासाठी त्यांच्यावर फवारण्यासाठी घरच्या घरी किटकनाशक कसे तयार करायचे आज आपण पाहणार आहोत. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या आणि अगदी २ पदार्थांपासून तयार होणारे हे किटकनाशक कसे करायचे पाहूया...

१. एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात १ मूठ तांदूळ घालायचे. 

२. त्यामध्ये १ चमचा बेकींग सोडा घालायचा. 

३. हे मिश्रण चांगले एकजीव करायचे आणि त्यामध्ये व्हाईट व्हिनेगरचे काही थेंब घालायचे. 

४. मग हे मिश्रण एका स्प्रे बाटलीमध्ये भरायचे.

५. पानं पिवळी पडलेल्या किंवा सुकलेल्या रोपांवर स्प्रे बाटलीने हे मिश्रण फवारायचे. 

६. साधारण २ ते ३ दिवस हे मिश्रण रोपांवर फवारल्यास रोपांना नवीन पालवी फुटण्यास मदत होते. 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सहोम रेमेडी