Join us  

कुंडीतल्या रोपांना रोज पाणी घालायला वेळ नाही? १ सोपी ट्रिक, रोपं सुकण्याची चिंता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2024 3:01 PM

Easy tips for automatic watering for plants : गावाला गेलो तरी रोपांना सहज पाणी मिळावं यासाठी सोपी ट्रिक...

आपल्या घरातल्या बागेत किमान ४-६ रोपं तरी असतातच. या रोपांची आपण नित्यनेमाने शक्य तितकी काळजी घेत असतो. रोपांना रोज पाणी घालणे, वेळोवेळी त्यांची छाटणी करणे, खतं आणि किटकनाशकं वापरुन त्यांना किडीपासून दूर ठेवणे अशा सगळ्या गोष्टी आपण करत असतो. पण कधीतरी अचानक आपल्याला कामानिमित्त नाहीतर फिरण्यासाठी गावाला जायची वेळ येते. अशावेळी या रोपांना पाणी घालायचे कसा असा यक्षप्रश्न आपल्याला पडतो. मग रोपांना पाणी घालण्यासाठी शेजारीपाजारी किंवा वॉचमनकडे किल्ली देऊन ठेवावी लागते आणि त्यांना पाणी घालण्यास सांगावे लागते (Easy tips for automatic watering for plants). 

तेही शक्य नसेल तर अनेकदा काही जण रोपंच बाहेर आणून ठेवतात आणि आजुबाजूला राहणाऱ्यांना रोपांना पाणी घालण्याची विनंती करतात. पण असं सगळं करण्यापेक्षा रोपांना अगदी सहज पाणी मिळावं यासाठी एक सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत. यामुळे अगदी महिनाभरही रोपांना पाणी घातलं नाही तरी चालू शकतं. पाहूयात ही ट्रिक कोणती आणि ती कशी करायची. यामुळे आपण गावाला गेल्यावर रोपं जिवंत राहण्याचा प्रश्न निश्चितच मार्गी लागू शकतो. 

(Image : Google)

१. साधारण अर्धा ते १ लिटरची पाण्याची बाटली घ्या.

२. त्याच्या झाकणाला एक लहानसे होल पाडाट

३. एका लहान आकाराच्या लाकडी काठीला कापूस लावा आणि ती काठी या झाकणाला पाडलेल्या होलमधून आत घाला.

४. बाटलीच्या दोन्ही बाजूला चॉपस्टीक किंवा त्यासारख्या काड्या चिकटवा.

५. बाटली पाण्याने भरा आणि या चॉपस्टीक कुंडीत रोपाच्या कडेला आत खोचून बाटली उलटी करा.

६. कापूस लावलेल्या काडीतून थेंब थेंब पाणी कुंडीतील मातीत पडत राहील आणि रोपाला पाणी मिळत राहील. 

७. साधारण १ लीटरची बाटली असेल तर जवळपास महिनाभर हे पाणी थेंब थेंब करुन रोपांना मिळत राहते त्यामुळे वेगळे पाणी घालण्याची आश्यकता राहत नाही. 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स