Join us  

शहाळे पिऊन झाल्यानंतर फेकून देता? अजिबात फेकू नका, पाहा भन्नाट आयडिया, करा घरात डेकोरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2022 1:16 PM

These eco friendly coconut hanging pots will create a natural look in any room : जे लोक रोज शहाळे पिऊन दिवसाची सुरुवात करतात अश्या लोकांना शहाळे पिऊन झाल्यावर त्याच नेमकं करायचं काय ? असा प्रश्न पडत असेल.

नारळ जेव्हा ताजा आणि कोवळा असतो तेव्हा त्याला 'शहाळे' असे म्हणतात. आपण लहानपणापासून शहाळ्याचे पाणी व त्यातील मलई खात आलो आहोत. कित्येक लोकांच्या दिवसाची सुरुवात शहाळ्याचे पाणी पिऊन होते. शहाळ्याचे पाणी हे वर्षाचे बाराही महिने उपलब्ध असते. या पाण्यात खूप कमी कॅलरीज असल्यामुळे जे लोक डाएट करतात ते आवर्जून शहाळ्याचे पाणी पितात. रक्तदाब पातळी कमी करण्यास हे मदत करते. शहाळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्हाला दिवसभर भूक लागत नाही आणि तुम्ही ओव्हरइटिंगपासून दूर राहू शकता. वजन कमी करण्यासोबतच नारळ पाण्याचे सेवन थायरॉईड हार्मोन्स संतुलित ठेवते. उन्हाळ्याच्या दिवसांत नारळ पाण्याचे सेवन तुम्हाला डिहायड्रेशनपासून वाचवते. तसेच त्वचेला पोषण देण्यासाठी नारळ पाणी फायदेशीर आहे. रोज सकाळी शहाळ्याचे पाणी प्यायल्याने संपूर्ण दिवस शरीरात एनर्जी राहते आणि यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. असे या शहाळाचे भरपूर फायदे आहेत. जे लोक रोज शहाळ पिऊन दिवसाची सुरुवात करतात अश्या लोकांना शहाळ पिऊन झाल्यावर त्याच नेमकं करायचं काय ? असा प्रश्न पडत असेल. हे शहाळ वेस्ट म्हणून कचऱ्यात फेकून न देता... तुमच्या घराची शोभा वाढविण्यासाठी उपयोगी आले तर... (These eco friendly coconut hanging pots will create a natural look in any room).

शहाळ फेकून न देता त्याच्या कुंड्या तयार करून घराची शोभा कशी वाढवता येईल, या व्हिडीओ मधून जाणून घेऊया. vimmyz_creations या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

 

 

शहाळ फेकून न देता त्याचा नेमका वापर कसा करावा ?कित्येक लोकांना आपल्या घरात व आजूबाजूच्या परिसरात झाडे लावून घराची शोभा वाढविण्याची आवड असते. आपण घरात, गच्चीवर झाडे लावण्यासाठी मोठं - मोठाल्या कुंड्या विकत घेऊन येतो. या कुंड्या कधी मातीच्या तर कधी प्लॅस्टिकच्या असतात. पण या कुंड्यांमध्ये रोप लावल्यावर त्या कुंड्या एकाच ठिकाणी ठेवाव्या लागतात. परंतु जर तुम्ही शहाळ्यापासून घरच्या - घरी कुंड्या तयार केल्या तर घरात, बेडरूम, गॅलरी कुठेही तुम्ही त्या शिफ्ट करू शकता. 

  शहाळ्यापासून कुंड्या कश्या तयार कराव्यात ?१. शहाळ्यातील पाणी पिऊन झाल्यानंतर त्यातील मलई काढून ते स्वच्छ करून घ्या. २. सुरीच्या मदतीने शहाळ्याचा वरचा भाग थोडा किसून मोठा करा जेणेकरून त्यात रोप सहज लावता येईल. ३. सुरीच्या मदतीने या शहाळ्याच्या खालील भागात एक छिद्र करून घ्या. जेणेकरून रोपाला पाणी घातल्यास जास्तीचे पाणी     वाहून जाईल. तसेच वरील बाजूस दोन छिद्रे करून घ्या म्हणजे सुतळ वापरून घरात कुठेही या कुंड्या तुम्ही हँग करू शकता.   ४. शहाळ्याच्या बाहेरील बाजूस अ‍ॅक्रॅलिक पेंटच्या मदतीने तुम्हाला आवडेल असे डिझाईन किंवा पेंट करून घ्या. ५. पेंट सुकल्यावर त्यात माती घालून तुम्हाला आवडेल ती रोपं लावून घ्या. ६. सुतळीचा वापर करून हॉल, बेडरूम, गॅलरी किंवा खिडकीत हँग करू शकता.

टॅग्स :बागकाम टिप्स