Lokmat Sakhi >Gardening > गुलाबाला पानंच भरपूर-फुलांचा पत्ताच नाही; मातीत चमचाभर 'हे' दाणे मिसळा, भरगच्च फुलं येतील

गुलाबाला पानंच भरपूर-फुलांचा पत्ताच नाही; मातीत चमचाभर 'हे' दाणे मिसळा, भरगच्च फुलं येतील

Tips To Make Homemade Liquid Fertilizer For Rose Plant : गुलाबाच्या रोपाची माती व्यवस्थित खोदून त्यात मोहोरीपासून तयार करण्यात आलेलं हे खत घाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 06:42 PM2024-10-24T18:42:24+5:302024-10-25T11:37:48+5:30

Tips To Make Homemade Liquid Fertilizer For Rose Plant : गुलाबाच्या रोपाची माती व्यवस्थित खोदून त्यात मोहोरीपासून तयार करण्यात आलेलं हे खत घाला.

Follow These Tips To Make Homemade Liquid Fertilizer For Rose Plant | गुलाबाला पानंच भरपूर-फुलांचा पत्ताच नाही; मातीत चमचाभर 'हे' दाणे मिसळा, भरगच्च फुलं येतील

गुलाबाला पानंच भरपूर-फुलांचा पत्ताच नाही; मातीत चमचाभर 'हे' दाणे मिसळा, भरगच्च फुलं येतील

गुलाबाचं फुल (Rose Plant) आपल्या बागेत असावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण योग्य काळजी न घेतल्यामुळे आणि पोषक तत्वांच्या  कमतरतेमुळे गुलाबाला फुलं येत नाहीत. गुलाबाच्या रोप घरी आणल्यानंतर फुलं आले नाही तर रोपाचा काय उपयोग असं वाटतं.  रोपात पानांची वाढ होते पण फुलं येत नाहीत  अशी अनेकांची तक्रार असते. गुलाबाचे रोप बहरण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आणि टिप्स पाहूया. (Natural Fertilizer For Rose Plant)

व्हॉईस ऑफ प्लाटच्या अहवालानुसार मोहोरीपासून तयार केलेले मस्टर्ड केक्स हे खत वनस्पतींसाठी विशेषत: भाज्या किंवा फुलांच्या रोपासाठी फायदेशीर असल्याचं सिद्ध झालं आहे. हे खत दिल्यानंतर झाडांची लक्षणीय वाढ होते. आऊटडोअर प्लांन्ट, फुल झाडं किंवा भाज्यांची रोपं प्रत्येक रोपाला नायट्रोजनची आवश्यकता असते. मोहोरीच्या तेलात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात. ज्यामुळे रोपांची उत्पादनाची क्षमता वाढते. मातीची उत्पादकता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मोहोरी फायदेशीर ठरते.

मोहोरीच्या बियांचे खत हे ऑर्गेनिक खत आहे. यात कोणतेही केमिकल्स नसतात.  हे केक्स  तुम्हाला बाजारात सहज मिळतील ते टिकायलाही खूप चांगले असतात.  तुम्ही २ पद्धतीनं याचा वापर करू शकता. मस्टर्ड केकचे लहान तुकडे करून एका भांड्यात घाला  त्यात पाणी घालून झाकण ठेवा. २४ तासानंतर राईस केक पूर्णपणे  वितळलेला असेल त्यानंतर तुम्ही हे पाणी रोपात घालू शकता. 

गुलाबाचे रोप वाढण्यासाठी त्यात मोहरी घालणं हा एक पारंपारीक उपाय आहे. ज्यामुळे रोपाची वाढ चांगली होते. त्यासाठी पिवळी मोहोरी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्या. नंतर मोहोरीची पावडर अर्धा मग पाण्यात मिसळा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

चेहरा डल दिसतोय-डार्क सर्कल्स आलेत? रात्री व्हिटामीन ई कॅप्सूल या पद्धतीनं लावा, चेहऱ्यावर येईल तेज

गुलाबाच्या रोपाची माती व्यवस्थित खोदून त्यात मोहोरीपासून तयार करण्यात आलेलं हे खत घाला. आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा हे नैसर्गिक खत रोपात घाला. हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल.

Web Title: Follow These Tips To Make Homemade Liquid Fertilizer For Rose Plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.