अनेकांची अशी तक्रार असते, की उन्हाळ्यात झाडं लगेच वाळतात (Fertilizer). झाडांवर कीटक पसरतात. ज्यामुळे झाडांवर एक ही फुल किंवा फळ येत नाही. झाडांची योग्य वाढ व्हावी म्हणून सूर्यप्रकाश, पाणी आणि खत गरजेचं आहे (Gardening Tips). बाजारात खत महाग मिळते. त्यामुळे बरेच जण घरीच खत तयार करतात. आपण किचनमधल्या काही साहित्यांचा वापर करूनही खत तयार करू शकता (Summer Special).
बऱ्याचदा पदार्थ तयार केल्यानंतर बटाटे, कांदे, लिंबाच्या साली कचरापेटीत फेकून देतो. पण भाज्यांच्या साली फेकून देण्याऐवजी आपण त्याचा वापर करून झाडांसाठी खत तयार करू शकता. भाज्यांच्या सालींचे खत झाडांसाठी उपयुक्त ठरते. भाज्यातील पौष्टीक घटकांमुळे झाडांभोवती कीटक फिरणार नाही. शिवाय झाडांची योग्य वाढ होईल. पण भाज्यांचा सालींचा वापर झाडांसाठी खत म्हणून कसा करावा? पाहूयात(Food For Plants: Kitchen Scraps That Instantly Fertilizer Without Composting).
भाज्यांच्या सालीने करा नैसर्गिक खत
लागणारं साहित्य
लसणाच्या पाकळ्या
कांद्याची साल
बटाट्याची साल
उन्हाळ्यात कुंडीतल्या फळझाडांची पानं पिवळी-फळंच येत नाहीत? ५ टिप्स, फळांनी डवरेल झाड
भाज्यांचे पाणी
अशा प्रकारे तयार करा भाज्यांचे सालीचे नैसर्गिक खत
एका बरणीत लसूण, बटाटे आणि कांद्याच्या साली घालून मिक्स करा. भाज्या धुतल्यानंतर आपण पाणी फेकून देतो, पण ते पाणी फेकून न देता, आपण बरणीत साठवून ठेऊ शकता. आता बरणीला झाकण लावा. २ दिवसांसाठी बरणी थंड ठिकाणी ठेवा. २ दिवसानंतर झाडांसाठी नैसर्गिक खत तयार होईल.
या खतामध्ये पॉटेशियम, नायट्रोजन, कॅल्शियम, सल्फर आणि मॅग्नेशियम आढळते. ज्यामुळे झाडांना पोषण मिळते, व झाड नव्याने बहरते.
लिंबाचे झाड वाढतच नाही? कुंडीतल्या मातीत मिसळा एक फुकट मिळणारी गोष्ट; रसाळ लिंबू हवेत तर..
आता एका बादलीत पाणी घ्या. त्यात भाज्यांच्या सालीपासून तयार पाणी घालून मिक्स करा. आपण या पाण्याचा वापर झाडांवर आठवड्यातून २ वेळा करू शकता. या खतामुळे झाडांभोवती कीटक फिरकणार नाही. शिवाय झाडांची योग्य वाढ होईल.