Join us  

जुना झाडू फेकू नका, बागेच्या सजावटीसाठी वापरा- बघा बागेचा लूक बदलणाऱ्या ३ सुंदर आयडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2024 1:51 PM

Garden Decoration Ideas Using Old Broom: जुना झालेला झाडू फेकून देत असाल तर थोडं थांबा आणि गार्डन डेकोरेशनसाठी असणाऱ्या या काही सुंदर आयडिया पाहा.. (best reuse of old broom)

ठळक मुद्देजुन्या झालेल्या झाडूतल्या जाड काड्या वापरून वेलींना आधार देणारी छानशी जाळी तयार करता येते.

कलात्मक दृष्टी असेल तर अगदी जुन्या, भंगार सामानातूनही काहीतरी सुंदर कलाकृती निर्माण करता येते. असंच काहीसं झाडूचंही आहेच. झाडूचा उपयोग घर झाडण्यासाठीच होतो. तो जुना झाला की त्याचा काहीही उपयोग नाही, हे बहुसंख्य जणांना वाटतं. पण काही कलाकारांना मात्र ते अजिबातच मान्य नाही. म्हणूनच तर काही जण जुन्या झालेल्या झाडूचा अतिशय उत्तम उपयोग बागेच्या सजावटीसाठी करून घेतात (best reuse of old broom). तुम्हालाही अगदी कमी पैशात तुमची बाग छान सजवायची असेल आणि तिचा लूक एकदम बदलून टाकायचा असेल (how to use old broom for gardening?) तर या काही टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी येऊ शकतात.(garden decoration ideas using old broom)

 

बागेच्या सजावटीसाठी जुन्या झाडूचा कसा वापर करावा?

१. बाल्कनीतल्या छोट्याशा कुंडीत आपण एखादी तरी वेल लावतोच. वेलींना वाढण्यासाठी कशाचा तरी आधार पाहिजे असतो. त्यासाठी जुन्या झालेल्या झाडूतल्या जाड काड्या वापरून वेलींना आधार देणारी छानशी जाळी तयार करता येते.

कार्तिकी एकादशी : विठोबाला प्रिय असलेल्या तुळशीचे पाहा सुंदर प्रकार, प्रत्येक तुळस औषधी आणि बहुगुणी !

त्यासाठी झाडूमधल्या थोड्या जाड काड्या घ्या आणि त्या एकाच उंचीच्या कापा. त्यानंतर या काड्या उभ्या- आडव्या एकमेकींना जोडा आणि त्यांची जाळी तयार करा. ही जाळी वेल लावलेल्या कुंडीतल्या मातीत खोचा. जशी जशी वेल वाढेल तशी तशी ती जाळीवर चढवा. हळूहळू वेलीचा छान हिरवा पडदा तयार झाल्यासारखा लूक येईल.

 

२. वरील पद्धतीने खूप जास्त डेकोरेटीव्ह करण्याची इच्छा नसेल किंवा तेवढा वेळ नसेल तर झाडूच्या खालचं जे प्लास्टिकचं हॅण्डल असतं, त्याला सुतळी गुंडाळा.

९० टक्के महिला किचनमध्ये ४ ठिकाणी स्वच्छता करायला विसरतात! त्यामुळेच मुंग्या- झुरळं वाढतात

आता हे कुंडीच्या मधोमध खोचा. वाढणारी वेल त्याभोवती गुंडाळून तिला चांगला आधार देता येईल.

 

३. थोडे पसरट खराटा असणारे प्लास्टिकचे मोठे झाडू असतील तर त्यावर कलाकुसर करून खूप छान बाहुल्या तयार करता येतात. त्यासाठी ॲक्रॅलिक रंग, वेगवेगळ्या लेस, घरातले जुने कपडे, जुना चष्मा- गॉगल अशा वस्तूंचा वापर करता येतो. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सगृह सजावट