‘अॅन अॅपल अ डे कीप डॉक्टर अवे’ (An Apple A Day Keep Doctor Away) ही म्हण आपण अनेकदा ऐकलेली आहे. सफरचंदामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे असंख्य घटक असल्याने या फळाला जगभरात विशेष महत्त्व आहे. लहान बाळांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत आणि रुग्णांपासून ते खेळाडुंपर्यंत सगळेच आवर्जून सफरचंद खातात. त्यामुळेच सफरचंदाचे भाव कायमच खूप जास्त असतात. सामान्यांना हे फळ अनेकदा परवडतेच असे नाही. अशावेळी आपल्या होम गार्डनमध्ये सफरचंद पिकवले तर त्याची मजा काही औरच. यासाठी तुमचे शेत असण्याची किंवा खूप जास्त जागा असण्याचीही आवश्यकता नाही. तर योग्य ती माहिती घेऊन प्रेमाने हे सफरचंदाचे रोप वाढवल्यास घरच्या बागेतली फळं खाण्याचा आनंद आपल्याला घेता येऊ शकतो (Gardening Instagram post of Actress Ashwini Bhave Green Apple).
प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने आपल्या गार्डनमधील सफरचंदांसोबत फोटो अपलोड केला आहे. ही सफरचंद नेहमीसारखी नसून ती हिरव्या रंगाची आहेत. या फोटोमध्ये अश्विनी भावे यांच्या आईही सोबत दिसत आहेत. या पोस्टला कॅप्शन देताना अश्विनी म्हणतात, ‘An apple of my eye with an apple of my garden’. एका स्टीलच्या पाटीमध्ये आणि दोघींनी हातात घेतलेली सफरचंद किती रसाळ आहेत हे त्याकडे पाहून आपल्याला सहज दिसते. अश्विनी भावे यांना बागकामाची आवड असून त्या नेहमी आपल्या बागेत केलेल्या प्रयोगांचे काही ना काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
अश्विनीची गार्डनिंगची आवड आणि ग्रीन डोअरच्या माध्यमातून ती याविषयात करत असलेलं काम, हे तर तिच्या चाहत्यांना माहितीच आहे. ती गार्डनिंगच्या बाबतीत सतत काही ना काही नवीन प्रयोग करत असते आणि त्याबाबतची माहिती इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांना देत असते. काही दिवसांपूर्वी अश्विनी यांनी आपल्या किचन गार्डनविषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने भाज्या लावायच्या आणि त्या कशा वाढवायच्या याबाबत माहिती दिली होती. आताच्या पोस्टला ४ हजारांहून अधिक जणांनी लाईक केले असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.