Lokmat Sakhi >Gardening > कुंडीतल्या झाडांवर रोग पडून पानांना छिद्र पडली? स्वयंपाकघरातला १ पदार्थ वापरा, कीड गायब

कुंडीतल्या झाडांवर रोग पडून पानांना छिद्र पडली? स्वयंपाकघरातला १ पदार्थ वापरा, कीड गायब

Easy Way To Get Rid Of Bugs On Plants: झाडांवर रोग पडला असेल तर सुरुवातीला इतर कोणतीही किटकनाशकं फवारण्याआधी हा प्रयोग करून पाहा..(homemade Insecticides for terrace garden)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2024 04:51 PM2024-01-12T16:51:45+5:302024-01-12T17:18:15+5:30

Easy Way To Get Rid Of Bugs On Plants: झाडांवर रोग पडला असेल तर सुरुवातीला इतर कोणतीही किटकनाशकं फवारण्याआधी हा प्रयोग करून पाहा..(homemade Insecticides for terrace garden)

Gardening Tips: An easy way to get rid of bugs on plants, How to keep insects away from plants, use of salt for plants, homemade Insecticides for terrace garden | कुंडीतल्या झाडांवर रोग पडून पानांना छिद्र पडली? स्वयंपाकघरातला १ पदार्थ वापरा, कीड गायब

कुंडीतल्या झाडांवर रोग पडून पानांना छिद्र पडली? स्वयंपाकघरातला १ पदार्थ वापरा, कीड गायब

Highlightsझाडांवर रोग पडू नये किंवा झाडांभोवती खूप किडे येऊ नयेत, म्हणूनही हा उपाय तुम्ही करू शकता. 

आपण झाडांची पुरेपूर काळजी घेतो. त्यांना योग्यप्रकारे पाणी, ऊन मिळतंय की नाही याची काळजी घेतो. तसेच वेळोवेळी झाडांना खतही देतो. पण तरीही बऱ्याचदा असं होतं की झाडांवर किडा पडतो किंवा रोग पडतो. झाडांवर रोग पडला की मग पानांना छोटी- छोटी छिद्र पडलेली दिसतात. फुलांचा आकारही लहान होऊन जातो आणि पाकळ्यांवरही लहान छिद्र दिसू लागतात. यावर वेळीच उपाय करणं गरजेचं असतं (An easy way to get rid of bugs on plants). कारण हा रोग हळूहळू झाड पोखरून टाकतो (How to keep insects away from plants). म्हणूनच असं झालं तर सगळ्यात आधी झाडांवर इतर कोणतीही किटकनाशकं फवारण्यापेक्षा हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(homemade Insecticides for terrace garden)

 

झाडांवर रोग पडल्यास घरगुती उपाय

झाडांवर रोग पडला असेल तर कोणता  घरगुती उपाय करावा, याविषयीचा एक व्हिडिओ peepalbaba या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

या व्हिडिओमध्ये असं सांगितलं आहे की झाडांवर रोग पडल्यास तो घालविण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातलं मीठ वापरा.

पुरुषांना तरी मनातलं बोलण्याचं, रडण्याचं स्वातंत्र्य कुठं आहे?- मिथिला पालकर सांगते अवतभवतीच्या पुरुषांची घुसमट

उपाय अगदी सोपा असून तो करण्यासाठी दिड ते दोन लीटर पाणी घ्या. त्यात २ टेबलस्पून मीठ घाला आणि हे पाणी जिथे रोग पडला आहे त्या झाडांच्या पानांवर, फुलांवर शिंपडा.

झाडांवर रोग पडू नये किंवा झाडांभोवती खूप किडे येऊ नयेत, म्हणूनही हा उपाय तुम्ही करू शकता. 

१० दिवसांतून एकदा हा उपाय करावा.

 

हा उपायही करून पाहा

झाडांवर रोग पडला असल्यास बेकिंग सोडा आणि व्हिनेगर हे दोन पदार्थही खूप उपयुक्त ठरतात.

खास हिवाळ्यासाठी फुल स्लिव्ह्ज बाह्यांचे लेटेस्ट पॅटर्न, दिसाल स्टायलिश- आकर्षक

यासाठी १ लीटर पाणी घ्या. त्यात अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा आणि १ टेबलस्पून व्हिनेगर घाला. व्हिनेगर नसेल तर २ टेबलस्पून लिंबाचा रस घातला तरी चालेल.

हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि आठवड्यातून एकदा झाडांवर शिंपडा. झाडांवर कोणताही रोग पडणार नाही. 

 

Web Title: Gardening Tips: An easy way to get rid of bugs on plants, How to keep insects away from plants, use of salt for plants, homemade Insecticides for terrace garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.