Join us  

कुंडीतल्या मातीला वाळवी लागली, झाडं सुकून चालली? खराब झाली म्हणून माती फेकू नका, 'हे' उपाय करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 6:23 PM

पावसाळ्यात बऱ्याचदा असं होतं की कुंडीमधल्या मातीला कीड लागते किंवा वाळवी लागते अणि झाडं सुकतात. असं झालं तर लागेचच माती फेकून देऊ नका. काही सोपे उपाय करून बघा.

ठळक मुद्देमातीमध्ये किडे दिसले म्हणून ती थेट फेकून देऊ नका. त्याआधी घरातल्या घरात काही उपाय करून बघा. नक्कीच पुन्हा एकदा झाडांची वाढ चांगली होऊ लागेल.

कुंडीतल्या मातीकडे व्यवस्थित लक्ष दिलं गेलं नाही, किंवा माती नियमितपणे वर- खाली न करता आपण केवळ पाणी टाकत राहिलो किंवा माती टाकत गेलो, तर कुंडीत मातीचे थर तयार होतात आणि ती दिवसेंदिवस खराब होत जाते. काही दिवसांनी या मातीत किडे दिसू लागतात आणि मग हळूहळू झाडंही सुकू लागतात. अशा वेळी माती खराब झाली म्हणून आपण ती फेकायला निघतो. पण मातीमध्ये किडे दिसले म्हणून ती थेट फेकून देऊ नका. त्याआधी घरातल्या घरात काही उपाय करून बघा. नक्कीच पुन्हा एकदा झाडांची वाढ चांगली होऊ लागेल.

 

कुंडीतील मातीला कीड लागली असेल तर....१. सुरूवातीच्या खुरप्याच्या मदतीने दर तीन- चार दिवसाने माती वर- खाली करा. यामुळे फायदा होतो. सगळ्यात आधी हा उपाय करावा आणि फरक नाही पडला तर अन्य उपाय करता येतात.

२. व्हिनेगर किंवा ताकाचा वापर कराएक मध्यम आकाराची बादली भरून पाणी घ्या. यामध्ये ६ ते ७ टेबलस्पून व्हिनेगर टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या अणि थोड्या थोड्या वेळाने एक- एक मग याप्रमाणे हे पाणी झाडांना द्या. हे कुंडी छोटी असल्यास हे पाणी दोन दिवस वापरले तरी चालते. त्यानंतर खुरप्याच्या साहाय्याने माती उकरून पहा. कीड गेलेली नसेल, तर पुन्हा एक- दोन दिवस हा प्रयोग करून पहा.असेच ताकाचे आहे. दोन ग्लास ताक आणि चार ग्लास पाणी असे मिश्रण झाडांना थोड्या थोड्या वेळाने टाकावे. माती उकरून वर- खाली करावी आणि पुन्हा एकदा हे मिश्रण टाकावे. यामुळेही कुंडीतली कीड नाहीशी होते.

 

३. कडुलिंबाच्या पानांची पावडरकडुलिंबाच्या पानांची पावडर तयार करा. पाने वाळवायला वेळ नसेल, तर ती पाने कढईत टाका. पानांमधला ओलावा जाईपर्यंत पाने हलवून घ्या. यानंतर पाने थंड झाल्यावर ती मिक्सरमध्ये टाकून फिरवून घ्या आणि त्याची पावडर बनवा. कुंडीतली माती वर- खाली करून त्यामध्ये कडुलिंबाची पावडर टाका. दोन- तीन दिवस सातत्याने हा प्रयोग करून पहा.

 

४. झाडाला उन द्यारोपट्यांना सातत्याने पाणी जास्त होत असेल, तरीही कुंडीतील माती खराब होऊन त्याला कीड लागू शकते. त्यामुळे ज्या कुंडीला कीड लागली आहे, अशी कुंडी काही दिवस उन्हात ठेवून पहा आणि दररोज त्याच्यातली माती खुरप्याच्या साहाय्याने उकरत जा.  

टॅग्स :बागकाम टिप्स