Join us  

ट्रिपला गेल्यावर रोपांना पाणी कोण घालणार याचं टेन्शन? बघा बागेला ऑटोमॅटिक पाणी देण्याचं जुगाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2024 9:20 AM

Gardening Tips: उन्हाळी सहल प्लॅन करताना बागेतली हिरवीगार रोपं सुकण्याचं टेन्शन आलं असेल तर हा एक मस्त उपाय पाहून घ्या...(home hacks for watering plants automatically)

ठळक मुद्देहा एक मस्त उपाय पाहून घ्या आणि बिंधास्तपणे उन्हाळी सहलीला जा..

पावसाळा, हिवाळा या ऋतूंपेक्षा उन्हाळ्यात झाडं सुकण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. कारण या दिवसात उन्हाचा भयंकर कडाका असतो. तो बऱ्याचदा झाडांना सहन होत नाही. माती कोरडी पडते, त्यामुळे नेहमीपेक्षा जरा जास्तच पाणी घालावं लागतं. पण अशातच जर आपण अगदी १ दिवसासाठी जरी पाणी घालायला विसरलो, तरी रोपं लगेच कोमेजून जातात. मग उन्हाळी सहलीसाठी घराबाहेर पडताना बागेतल्या रोपांचं टेन्शन येणं अगदी साहजिक आहे. त्यामुळेच तर आता हा एक मस्त उपाय पाहून घ्या आणि बिंधास्तपणे उन्हाळी सहलीला जा (Gardening tips for automatic water supply to plants). बागेतल्या रोपांना आपोआप पाणी मिळत जाईल. (home hacks for watering plants automatically)

बागेतल्या रोपांना आपोआप पाणी पुरवठा करणारा उपाय

 

आपण घरी नसताना बागेतल्या रोपांना पाणी मिळावं यासाठी त्यांची कशी व्यवस्था करावी, याची माहिती Life With Wes & Alison: Comedy Sketches and Short Films या फेसबूक पेजवर शेअर करण्यात आली आहे.

यामध्ये जो उपाय सांगितला आहे त्यासाठी आपल्याला फक्त एक रिकामी बाटली, एक इअर बड आणि थोडा सेलोटेप वापरायचा आहे.

सगळ्यात आधी तर प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणाला एक छिद्र पाडा. त्यामध्ये एक इअर बड घाला. त्याचा थोडा भाग झाकणाच्या बाहेर तर जास्त भाग बाटलीच्या आत पाहिजे, अशा पद्धतीने ते बसवा. इअर बड नसेल तर एखादी जाडसर काडीही चालेल.

 

आता या बाटलीला एक छोटी काठी चिकटपट्टीने लावून टाका. काठीचं एक टोक कुंडीतल्या मातीत खोचा. बाटलीचं झाकण जमिनीच्या दिशेने येईल अशा पद्धतीने बाटली ठेवा. 

आता तुम्ही जेव्हा बाटली भराल तेव्हा तिच्यातलं एकेक थेंब पाणी गळेल आणि ते रोपांना मिळेल. अशा प्रकारे प्रत्येक कुंडीत एकेक बाटली फिक्स केली की रोपांना आपोआप पाणी मिळत जाईल. 

 

 

टॅग्स :बागकाम टिप्सपाणीसमर स्पेशलइनडोअर प्लाण्ट्स