Lokmat Sakhi >Gardening > फुलझाडांवर मावा पडला? बघा १ सोपा घरगुती उपाय, किड निघून जाईल- रोपं पुन्हा बहरतील

फुलझाडांवर मावा पडला? बघा १ सोपा घरगुती उपाय, किड निघून जाईल- रोपं पुन्हा बहरतील

How To Save Flowering Plants From Mealybugs Attack: कोणत्याही प्रकारच्या फुलझाडांवर मावा पडला असेल, किड लागली असेल किंवा कोणत्याही प्रकारचा रोग पडला असेल तर हा उपाय करून पाहा (Gardening tips).

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2024 05:24 PM2024-03-30T17:24:09+5:302024-03-30T17:25:07+5:30

How To Save Flowering Plants From Mealybugs Attack: कोणत्याही प्रकारच्या फुलझाडांवर मावा पडला असेल, किड लागली असेल किंवा कोणत्याही प्रकारचा रोग पडला असेल तर हा उपाय करून पाहा (Gardening tips).

Gardening tips for how to save flowering plants from Mealybugs attack, Home remedies for Mealybugs attack on plants, homemade pesticides for flowering plants | फुलझाडांवर मावा पडला? बघा १ सोपा घरगुती उपाय, किड निघून जाईल- रोपं पुन्हा बहरतील

फुलझाडांवर मावा पडला? बघा १ सोपा घरगुती उपाय, किड निघून जाईल- रोपं पुन्हा बहरतील

Highlightsआठवड्यातून दोन ते तीन वेळा हे मिश्रण झाडांवर नियमितपणे शिंपडलं तर काही दिवसांमध्येच झाडांवरचा रोग निघून जाईल आणि रोपं पुन्हा छान बहरतील.

आपण झाडांची पुरेपूर काळजी घेतो. त्यांना वेळोवेळी ऊन, पाणी, खत मिळेल याची काळजी घेतो. पण तरीही कधी कधी झाडांवर रोग पडतो. विशेषत: फुलझाडांवर पांढऱ्या रंगाचा मावा पडलेला दिसतो (Home remedies for Mealybugs attack on flowering plants). कधी कधी तर रोपांना किड लागते किंवा मुंग्या लागतात. त्यामुळे मग रोपांची वाढ खुंटते. चांगली फुलं येत नाहीत. असं काहीही तुमच्या बागेतल्या फुलझाडांबाबत झालं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा (homemade pesticides for flowering plants). कोणत्याही प्रकारच्या फुलझाडांवर पडलेली कोणत्याही प्रकारची किड किंवा रोग काढून टाकण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. 

फुलझाडांवर रोग पडला असल्यास उपाय

 

फुलझाडांवर बऱ्याचदा Mealybugs हा रोग पडतो. अशावेळी झाडांचं संरक्षण करण्यासाठी कोणता उपाय करावा, याविषयीचा व्हिडिओ theunlimitedgreens या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वयंपाक घरातलेच नेहमीचे पदार्थ वापरायचे आहेत.

एकाच गोष्टीचं खूप वाईट वाटतं की माझ्या मुलीला मी कधीच..... राणी मुखर्जी सांगतेय मनातलं दु:ख

त्यासाठी १ मध्यम आकाराचा कांदा घ्या. आल्याचा दिड ते दोन इंचाचा तुकडा घ्या आणि १ टेबलस्पून तिखट घ्या.

सगळ्यात आधी तर कांद्याची टरफलं काढून टाका आणि कांद्याची आणि आल्याची पेस्ट करून घ्या. 

 

एका स्प्रे बॉटलमध्ये १ लीटर पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये कांद्याची आणि आल्याची पेस्ट टाका. तसेच १ टेबलस्पून तिखट टाका. 

लग्न- समारंभात गळ्यात हवाच असा ठसठशीत मोत्याचा दागिना, बघा तन्मणीचे ८ मनमोहक डिझाईन्स...

हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि रोग पडलेल्या झाडांवर शिंपडा.

आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे मिश्रण झाडांवर नियमितपणे शिंपडलं तर काही दिवसांमध्येच झाडांवरचा रोग निघून जाईल आणि रोपं पुन्हा छान बहरतील.

 

Web Title: Gardening tips for how to save flowering plants from Mealybugs attack, Home remedies for Mealybugs attack on plants, homemade pesticides for flowering plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.