देवपुजेसाठी चालणारी दोन मुख्य फुलं म्हणजे जास्वंद आणि झेंडू. दसरा- दिवाळी या सणांना तर हमखास झेंडूची फुलं आपण घेतोच. तसेच आता सणावारांना सुरुवात झाली आहेच. गणपती, महालक्ष्मी, नवरात्री, दिवाळी असे एका मागे एक सण येणार. सणावारांना सजावटीसाठी, धार्मिक कार्यक्रमांसाठी फुलं लागतातच (how to take care of marigold plant?). अशावेळी जर तुमच्या घरातली झेंडूची फुलं तुम्हाला वापरता आली तर त्याचा आनंद निश्चितच काही वेगळा आहे.. म्हणूनच आता घरातल्या छोट्या कुंडीमध्ये झेंडूचं रोप कसं लावायचं, त्याची कशी काळजी घ्यायची ते पाहा (best fertilizer for marigold plant).. कमी वेळातच त्याला भरपूर फुलं येऊ लागतील.. (tips and tricks for getting more flower from marigold plant)
झेंडूच्या रोपाची काळजी कशी घ्यायची?
१. कुंडी आणि माती
झेंडूच्या रोपाला खूप मोठी कुंडी नसली तरी चालते. साधारणपणे १० ते १२ इंची कुंडी त्यासाठी पुरेशी ठरते. तसेच या रोपाला खूप चिकट माती नको. पाण्याचा निचरा व्यवस्थित होणारी माती हवी.
तज्ज्ञ सांगतात वयाच्या पंचविशीनंतर 'या' पद्धतीने दूध प्या, शरीराला होतील जास्त फायदे
माती ओलसर राहील याची काळजी घ्या. पण साचून राहील एवढं पाणी टाकू नका. तसेच झेंडूला पाणी देताना ते नेहमी त्याच्या मुळाशी द्यावं. पानांवर शक्यता टाकू नये. कारण या रोपाला ओलसरपणाचा त्रास हाेतो.
२. झेंडूच्या रोपाची जागा
झेंडूच्या रोपाला थंड हवेत, सावलीमध्ये ठेवू नका. उन्हात जास्त फुलून येणारं हे रोप आहे. त्यामुळे कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे तिला ३ ते ४ तास तरी भरपूर ऊन मिळेल.
जन्माष्टमी विशेष: श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी बघा कशी करायची पंजिरी, चवदार पंजिरीची सोपी रेसिपी
तसेच झेंडूच्या रोपाला फुलं आली की लगेचंच एक दोन दिवसांत त्या फुलाच्या खालची १ ते दिड इंचाची जागा छाटून टाकावी. यामुळे रोप महिना भरातच छान बहरून जाईल आणि लवकरच त्याला भरपूर कळ्या दिसू लागतील.
३. खत
झेंडूच्या रोपाल खूप खत घालण्याची गरज नसते. त्यामुळे केळीचं पाणी त्याला नियमितपणे दिलं तरी ते पुरेसं ठरतं.
रोजच्या कामात ५ सोपे बदल करा, महिनाभरातच वजन झटपट कमी होईल- व्हाल एकदम फिट
यासाठी केळीची सालं रात्रभर पाण्यात भिजवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी झाडांना द्या. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करावा. महिनाभरातच मोठ्या आकाराची भरपूर फुलं येतील.