Lokmat Sakhi >Gardening > रोपांसाठी फ्लॅटमध्ये जागाच नाही, बाल्कनीत ऊनही येत नाही? ३ टिप्स- घराचा १ कोपरा होईल हिरवागार

रोपांसाठी फ्लॅटमध्ये जागाच नाही, बाल्कनीत ऊनही येत नाही? ३ टिप्स- घराचा १ कोपरा होईल हिरवागार

Gardening Tips For Minimum Space: घरात रोपं लावायला जागाच नसेल तर कमीतकमी जागेत आणि कमीत कमी ऊन येत असतानाही कशी रोपं लावायची पाहा...(best plants for terrace garden)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2024 09:09 AM2024-08-09T09:09:22+5:302024-08-09T09:10:01+5:30

Gardening Tips For Minimum Space: घरात रोपं लावायला जागाच नसेल तर कमीतकमी जागेत आणि कमीत कमी ऊन येत असतानाही कशी रोपं लावायची पाहा...(best plants for terrace garden)

gardening tips for minimum space and low sunlight area, best plants for terrace garden | रोपांसाठी फ्लॅटमध्ये जागाच नाही, बाल्कनीत ऊनही येत नाही? ३ टिप्स- घराचा १ कोपरा होईल हिरवागार

रोपांसाठी फ्लॅटमध्ये जागाच नाही, बाल्कनीत ऊनही येत नाही? ३ टिप्स- घराचा १ कोपरा होईल हिरवागार

Highlightsही फ्लॅटला तर बाल्कनीही नसतात. काही ठिकाणी तर बाल्कनी असली तरी तिच्यात पुरेसं ऊन येत नाही.

हल्ली महानगरे वेगाने वाढत आहेत. त्यामुळे तिथे येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यांना सामावून घेण्यासाठी मग त्याठिकाणी एकावर एक मजले चढवले जातात. घराचे आकार मोठे करण्यासाठी बाल्कनी छोट्या केल्या जातात. त्यामुळे मग काही फ्लॅटला तर बाल्कनीही नसतात. काही ठिकाणी तर बाल्कनी असली तरी तिच्यात पुरेसं ऊन येत नाही. अशावेळी ज्यांना रोपं लावण्याची किंवा गार्डनिंगची हौस आहे त्यांची खूप पंचाईत होते. म्हणूनच अशा लोकांची गार्डनिंगची हौस भागविण्यासाठी या काही टिप्स पाहा (gardening tips for minimum space and low sunlight area). रोपांची निवड जर योग्य पद्धतीने केली तर तुमच्या घराचा एक कोपराही नक्कीच हिरवागार होऊ शकेल. (best plants for terrace garden)

कमी जागा आणि कमी ऊन असणाऱ्या ठिकाणी रोपं कशी लावावी?

 

१. सकलंट्स

ज्यांना गार्डनिंगसाठी खूपच कमी जागा आहे आणि शिवाय त्यांच्याकडे पुरेसं ऊनही येत नाही अशा लोकांनी सकलंट्स लावावे. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक आकर्षक सकलंट्स नर्सरीमध्ये मिळतात.

श्रावण स्पेशल: कांदा- लसूण न घालता करा हॉटेलसारखी चमचमीत ग्रेव्ही- बघा एकदम सोपी रेसिपी 

त्यांना वाढण्यासाठी सेमी शेड प्रकारातल्याच वातावरणाची गरज असते. ती रोपं तुमच्या कमी ऊन असणाऱ्या जागेसाठी परफेक्ट आहेत.

 

 

२. व्हर्टिकल गार्डनिंग

कमीतकमी जागा असणाऱ्या लोकांसाठी व्हर्टिकल गार्डनिंग हा एक खूप चांगला पर्याय आहे.

कॅस्टर ऑईल केसांना कसं लावावं? बघा खास पद्धत- केसांच्या सगळ्या समस्यांवर उत्तम उपाय

यामध्ये तुम्ही कुंड्यांचे उभे स्टॅण्ड आणून रोपं लावू शकता. अशा पद्धतीचे अनेक आकर्षक स्टॅण्ड तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग सईटवरही मिळू शकतात. 

 

३. हँगिंग गार्डन

कमीतकमी जागेत जास्तीतजास्त रोपं लावण्याचा तिसरा उपाय म्हणजे बाल्कनीत जिथे थोडी जागा असेल तिथे वर खिळे लावून त्याला कुंड्या अडकविणे आणि घरातल्या घरात छान हँगिंग गार्डन तयार करणे.

फॅटी लिव्हरचा त्रास? तज्ज्ञ सांगतात ५ सोपे उपाय, जेवणातले छोटेसे बदल लिव्हर ठेवतील ठणठणीत.. 

तुम्ही तुमच्या छोट्याशा जागेत आर्टिफिशियल ग्रासचाही वापर करू शकता. यामुळे तुमची छोटीशी बाग हिरवीगार होऊन जाईल. 


 

Web Title: gardening tips for minimum space and low sunlight area, best plants for terrace garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.