जाई- जुई- चमेली यांना बहर येण्याचा काळ म्हणजे पावसाळा आणि हिवाळा. तसंच मोगरा, मधुमालती, मधुकामिनी या सुवासिक फुलांचा बहर येण्याचा काळ म्हणजे उन्हाळा (How to take care of mogra before starting summer). एप्रिल, मे या महिन्यांत तर ही फुलझाडं नुसतील बहरलेली असतात. पण काही काही जणांची अशी तक्रर असते की ऐन हंगामातही त्यांच्याकडच्या मोगऱ्याला फुलंच येत नाहीत. किंवा आली तरी ती खूपच कमी असतात. असं होऊ नये, यासाठी काय करावं (Gardening tips for Mogra plant), आणि ऐन हंगामात मोगऱ्याला भरपूर बहर येण्यासाठी हंगाम सुरू होण्याच्या आधीच त्याला कसं तयार करायचं, ते पाहूया.... (What to do for getting more flowers from mogra)
उन्हाळ्यात मोगऱ्याला भरपूर बहर येण्यासाठी उपाय
१. छाटणी
कोणत्याही झाडाला चांगला बहर येण्यासाठी किंवा झाडाची चांगली वाढ होण्यासाठी त्याची छाटणी करणे खूप महत्त्वाचे आहे. मोगऱ्याची छाटणी करण्यासाठी हा काळ सगळ्यात चांगला आहे.
लहान मुलांमधील लठ्ठपणा वाढविणारे ३ पदार्थ; बघून घ्या तुमची मुलंही 'हे' पदार्थ खातात का....
त्यामुळे मोगऱ्याच्या ज्या फांद्यांना अजिबातच पाने नाहीत किंवा अगदीच विरळ पाने आहेत, पाने पिवळी पडून सुकली आहेत, अशा फांद्या कापून टाका.
२. खत
मोगऱ्याला बहर येण्यासाठी आणि त्याची चांगली वाढ होण्यासाठी मोगऱ्याला आताच थोडं खत टाकून द्या. आतापासून ते मे महिन्यापर्यंत दर दोन आठवड्यांनी मोगऱ्याला खत घाला.
ड्रेसच्या रंगानुसार लिपस्टिकची शेड कशी ठरवायची? बघा खास टिप्स, दिसाल आणखी स्मार्ट- आकर्षक
हे खत म्हणजे शेणखत आणि गांडूळ खत यांचं मिश्रण असावं. खत घालण्यासाठी आधी कुंडीतली वरची माती थोडी उकरून घ्या. असं करताना मुळांना धक्का लागणार नाही, याची काळजी घ्या. यानंतर खत घाला आणि पाणी टाका.
३. सुर्यप्रकाश
माेगऱ्याच्या झाडाला भरपूर सुर्यप्रकाश लागतो.
चेहऱ्याला लावा 'हे' खास तेल, अजिबात सुरकुत्या येणार नाहीत- पिंपल्स, ॲक्ने, पिंगमेंटेशनही जाईल
त्यामुळे आतापासूनच तुमच्या अंगणातल्या किंवा बाल्कनीतल्या ज्या भागात जास्तीतजास्त ऊन असते, त्या भागात मोगऱ्याची कुंडी ठेवून द्या. या ३ गोष्टींची काळजी घेतली तर मग उन्हाळ्यात बघा कसा मस्त बहरेल तुमचा मोगरा.