मनीप्लांट हे असं एक रोप आहे ज्याची एरवी खूप काळजी घेण्याची गरज नसते. त्याला तुम्ही उन्हात ठेवा, सावलीत ठेवा तो कसाही, कुठेही छान वाढतो. पण थंडीच्या दिवसात मात्र त्याची थोडी विशेष काळजी घ्यावी लागते. कारण थंडीचा कडाका जसा जसा वाढत जातो, तशी तशी मनीप्लांटची पानं पिवळसर होत जातात (why money plant leaves get yellow?). हिरव्या पानांपेक्षा पिवळीच पानं जास्त दिसतात आणि नंतर ती झडायला लागतात. तुमच्या मनीप्लांटच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून ऑक्टोबर ते जानेवारी या काळात त्याची थोडी जास्त काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या ते पाहूया..(remedies for the fast growth of money plant)
मनीप्लांटची पानं पिवळी पडत असतील तर उपाय
मनीप्लांटची पानं पिवळी पडू नयेत तसेच त्याची जोमाने वाढ व्हावी यासाठी काय उपाय करावे, याची माहिती shanticreationsofficial या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
पंचविशीतच चाळिशीच्या दिसू लागलात? ५ टिप्स लक्षात ठेवा, कमी वयाच्या आणि जास्त आकर्षक दिसाल
त्यामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार कांद्याची टरफलं एका भांड्यात पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून घ्या. गाळून घेतलेल्या पाण्यामध्ये अर्धा चमचा कॉफी पावडर आणि अर्धा चमचा चहा पावडर टाका.
सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि हे पाणी एक लीटर पाण्यात मिसळून ते मनीप्लांटला टाका. पंधरा दिवसातून एकदा हा उपाय केल्यास मनीप्लांट छान हिरवागार राहील आणि त्याची जोमाने वाढ होईल.
अचानक पाहुणे येणार- नाश्त्याला काय करावं सुचेना? झटपट होतील असे ५ पदार्थ- करा चटकदार मेन्यू..
तसेच ऑक्टोबर ते जानेवारी या काळात मनीप्लांटची कटींग, रिपॉटिंग असं काहीही करू नका. त्याला या दिवसांत थोडं उन्हात ठेवा.
तसेच या दिवसांत मनीप्लांटला खूपच कमी पाणी घालावे. तसेच जेव्हा पाणी घालाल तेव्हा पानांवरही थोडं पाणी शिंपडून पानं स्वच्छ करावी. या काही गोष्टींची काळजी घेतल्यास थंडी कितीही वाढली तरी मनीप्लांटची पानं अजिबात पिवळी पडणार नाहीत.