Join us  

पावसाळ्यात कुंडीतली माती शेवाळली- हिरवीनिळी झाली? लवकर करा ३ गोष्टी, नाहीतर झाडं जातील कोमेजून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2023 11:49 AM

Gardening Tips For Rainy Season:पावसाळ्यात असं बऱ्याचदा होतं. अशावेळी झाडांचं नुकसान होऊ नये म्हणून वेळीच काही गोष्टी करायला पाहिजेत....(How to get rid of green algae in soil in pots)

ठळक मुद्देकुंडीतल्या मातीला शेवाळं आल्यासारखं होतं. असं झालंच तर वेळीच काही गोष्टी करायला पाहिजेत, जेणेकरून झाडांचं नुकसान होणार नाही.

उन्हाळा- हिवाळा या ऋतुंमध्ये आपण बागेतल्या झाडांना कितीही पाणी घातलं किंवा त्यांची कितीही काळजी घेतली तरी तिचं सौंदर्य तेवढं खुलत नाही, जेवढं पावसाच्या पाण्याने बहरून येतं... पावसाळ्यात झाडांवर एक वेगळीच चमक येते आणि ते प्रफुल्लित दिसतात, हे खरं असलं तरी अनेकदा खूप पाऊसही झाडांना सोसवत नाही. पावसाळ्यात सलग दोन- तीन दिवस जेव्हा पाऊस येतो आणि त्यानंतर काही दिवस वातावरण ढगाळ असतं, अशा वेळी कुंडीतल्या मातीला शेवाळं आल्यासारखं होतं. असं झालंच तर वेळीच काही गोष्टी करायला पाहिजेत, जेणेकरून झाडांचं नुकसान होणार नाही. (Why is the soil in pot turning green in monsoon?)

 

पावसाळ्यात कुंडीतली माती शेवाळली तर....पावसाळ्यात जर झाडांना अतिपाणी झाले तर कुंडीतल्या मातीवर एक काळपट हिरवा थर दिसू लागतो.

लॅपटॉप- कम्प्यूटरवर सतत काम करून खांदे, मान- पाठ आखडली? फक्त ३० सेकंदाचा व्यायाम, लगेच वाटेल रिलॅक्स

हा थर वेळीच काढून टाकणं गरजेचं आहे. कारण असं शेवाळं जर मातीत साचलं तर सुर्यप्रकाश किंवा पाण्यातून मिळणारे पोषण मुळांपर्यंत जात नाही. त्यामुळे मग योग्य पोषणमुल्ये न मिळाल्याने झाडे कोमेजायला किंवा झाडांची पाने पिवळी व्हायला सुरुवात होते. शिवाय मातीला फंगस होऊन त्यात किडे पडायला सुरुवात होते.

 

कुंडीतली माती शेवाळली तर उपायRemedies for green soil in pots

१. माती खाली- वर करायावरचा सोपा उपाय म्हणजे मातीचा थर खाली- वर करणे. यासाठी एखादा चमचा किंवा टोकदार वस्तू घ्या.

पाकिस्तानी तरुणीला ‘मिस युनिव्हर्स पाकिस्तान’चा मुकूट, मात्र देशात अनेकजण चिडले कारण..

त्याने कुंडीतल्या मातीचा साधारण एखाद्या इंचाचा थर उकरून घ्या. हे करताना मुळांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. 

 

२. गांडूळ खत किंवा कोकोपीटमाती खूप जास्त ओलसर झाल्यामुळे किंवा झाडांना गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाल्यामुळे माती हिरवट काळी होत जाते. त्यामुळे आधी वर सांगितल्याप्रमाणे माती थोडी उकरून घ्या. त्यानंतर त्यामध्ये कोकोपीट किंवा गांडूळ खत घाला. ते कुंडीतल्या मातीच्या वरच्या थरासोबत व्यवस्थित एकत्र करून घ्या.

३. कुंडीची जागा बदलाकाही झाडांना थेट पाऊस लागत असेल आणि तो ही खूप जास्त प्रमाणात, तर ते अजिबात सहन होत नाही. अशा झाडांची जागा काही दिवस बदलून पाहा. 

 

टॅग्स :बागकाम टिप्समोसमी पाऊसपाऊसइनडोअर प्लाण्ट्स