Lokmat Sakhi >Gardening > कुंडीतल्या जोमानं वाढलेल्या रोपांवर पानं कुरतडणारी अळी पडली? 'हा' सोपा उपाय करा- अळी गायब

कुंडीतल्या जोमानं वाढलेल्या रोपांवर पानं कुरतडणारी अळी पडली? 'हा' सोपा उपाय करा- अळी गायब

What To Do If Worms Eating Plants?: बऱ्याचदा असं होतं की रोपांवर रोग पडतो आणि अळी पानं कुरतडू लागते. अशावेळी हा एक सोपा उपाय करून पाहा.. (home remedies for worms eating leaf, buds of plant)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2024 01:36 PM2024-09-09T13:36:00+5:302024-09-09T16:32:29+5:30

What To Do If Worms Eating Plants?: बऱ्याचदा असं होतं की रोपांवर रोग पडतो आणि अळी पानं कुरतडू लागते. अशावेळी हा एक सोपा उपाय करून पाहा.. (home remedies for worms eating leaf, buds of plant)

gardening tips for plant growth, what to do if worms eating plants? home remedies for worms eating leaf, buds of plant | कुंडीतल्या जोमानं वाढलेल्या रोपांवर पानं कुरतडणारी अळी पडली? 'हा' सोपा उपाय करा- अळी गायब

कुंडीतल्या जोमानं वाढलेल्या रोपांवर पानं कुरतडणारी अळी पडली? 'हा' सोपा उपाय करा- अळी गायब

Highlights महिन्यातून २- ३ वेळाच हा उपाय करावा. हा उपाय केल्यानंतर रोपांवरचा रोग तर निघूनच जाईल पण पुन्हा त्यांची चांगली वाढ होण्यासही मदत होईल.

रोपांच्या वाढीसाठी फक्त पुरेसं पाणी मिळणं आणि ऊन मिळणं एवढंच गरजेचं नसतं. आपण त्यांना व्यवस्थित खत घातलं तरीही कधी कधी त्यांच्यावर रोग पडतो. बऱ्याचदा असं दिसून येतं की झाडांवर हिरवट, पिवळट, काळपट रंगाच्या अळ्या पडतात आणि या अळ्या पानं कुरतडतात. यामुळे रोपांची वाढ खुंटल्यासारखी होते. अशा पद्धतीची अळी जर रोपांवर पडली असेल आणि ती पानं, कळ्या कुरतडू लागली असेल तर लगेचच हा एक सोपा उपाय करून पाहा (what to do if worms eating plants?). हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुरटीचा वापर करायचा आहे. तुरटीचा वापर करून काही दिवसांतच रोपांना रोगमुक्त कसं करायचं ते पाहूया... (home remedies for worms eating leaf, buds of plant)

 

हा उपाय कसा करावा याविषयीचा एक व्हिडिओ walkwithnature__ या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी तुरटीचा एक छोटासा तुकडा घ्या आणि त्याची पावडर तयार करा.

पांढरे कपडे पिवळे पडले? 'हा' पदार्थ वापरून धुवा- जुने, पिवळट कपडेही होतील नव्यासारखे चमकदार

ही बारीकशी पावडर एक लीटर पाण्यात टाका आणि पाण्यात ती पूर्णपणे विरघळून जाऊ द्या. आता हे पाणी त्या रोपांवर शिंपडा आणि थोडं पाणी कुंडीतल्या मातीतही टाका. महिन्यातून २- ३ वेळाच हा उपाय करावा. हा उपाय केल्यानंतर रोपांवरचा रोग तर निघूनच जाईल पण पुन्हा त्यांची चांगली वाढ होण्यासही मदत होईल.


 

Web Title: gardening tips for plant growth, what to do if worms eating plants? home remedies for worms eating leaf, buds of plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.