सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे आपण अगदी हौशीने काही रोपं विकत आणतो आणि लावतो. त्या रोपांमध्ये बऱ्याचदा एखादं गुलाबाचं रोप असतंच. कारण गुलाबाचं टवटवीत फुललेलं छानसं फुल पाहिलं की दिवस कसा मस्त जातो. पण बऱ्याचदा असं होतं की गुलाबाला फुलं येतच नाहीत. किंवा अगदी महिन्यातून एखादंच फुल येऊन जातं. आपण गुलाबाची बऱ्यापैकी काळजी घेते. पुरेसं ऊन - पाणी मिळतंय की नाही ते पाहातो. पण तरीही म्हणावी तशी फुलं येतच नाहीत (best home made fertilizer for blooming rose). म्हणूनच अशावेळी काय करावं ते पाहा. गुलाबाला भरपूर फुलं येण्यासाठी बघा एक खास उपाय... (how to get maximum flowers from rose plant)
गुलाबाला भरपूर फुलं येण्यासाठी उपाय
गुलाबाला भरपूर फुलं येण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीचा एक व्हिडिओ my_garden_ideas88 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही घरगुती पदार्थ वापरायचे आहेत.
ऋषी सुनक यांचा राजीनामा, चर्चा मात्र अक्षता मुर्तींच्या ४२ हजार रुपयांच्या सुंदर ड्रेसची
तर त्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात अर्धा लीटर पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये आल्याचे जवळपास २ टेबलस्पून काप टाका असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. पण त्याऐवजी तुम्ही आल्याची १ टेबलस्पून पेस्ट घेतली तरी चालेल.
यानंतर त्या पाण्यातच १ चमचा साखर आणि व्हिनेगरचे काही थेंब टाका. हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. साखर पाण्यामध्ये पुर्णपणे विरघळल्यानंतर हे पाणी गुलाबाला द्या. तसेच थोडं पाणी रोपावरही शिंपडा.
आलं, साखर, व्हिनेगर यांच्यामधले पौष्टिक घटक रोपांच्या वाढीसाठी आणि भरपूर फुलं येण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. सुरुवातीला हा उपाय पंधरा दिवसातून एकदा करावा. त्यानंतर एकदा फुलं येण्यास सुरुवात झाली की महिन्यातून एकदा केला तरी चालेल.