घरात जर मोजक्या काही कुंड्या असतील, तर त्यात एखादं गुलाबाचं रोपटं हमखास असतंच.. गार्डनिंगची फार काही आवड नसणाऱ्या व्यक्तींच्या घरातही हमखास गुलाब डोकावतोच.... कारण फुलांच्या या राजाकडे नुसतं पाहिलं तरी मन प्रसन्न होतं. पण बऱ्याचदा गुलाब आपल्याला पाहिजे तसा फुलतंच नाही. सुकून जातो. किंवा मग नुसताच बहरतो, त्याला फुलंच येत नाहीत (How to make rose plants bushy and flowery?). म्हणूनच गुलाबासोबत असं काही होऊ नये म्हणून गुलाबाचं रोप लावताना काय काळजी घ्यावी किंवा जे गुलाबाचं रोप लावलेलं आहे, त्याची कशी काळजी घ्यावी याविषयीच्या या काही टिप्स बघा.... (Gardening tips for rose plant)
गुलाबाच्या रोपट्याची कशी काळजी घ्यावी?
१. सुर्यप्रकाश
गुलाबाच्या रोपट्याला दिवसातून ४ ते ५ तास तरी भरपूर सुर्यप्रकाश मिळाला पाहिजे.
नवरात्रात ९ दिवस उपवास करणार? ३ ड्रायफ्रुट्स, आजच खरेदी करा कारण..
त्यामुळे कुंडीची जागा अशी निवडा जिथे चांगले ऊन येईल. पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप प्रखर उन्हापासून मात्र या रोपट्याला वाचवावे लागते. सावलीत ठेवलेले गुलाबाचे झाड चांगले वाढत नाही.
२. कुंडीची निवड
गुलाब जमिनीमध्ये लावला तर तो खूप छानच वाढतो. पण त्याला अगदी चिटकून खूप झाडं लावू नका.
ब्लाऊज सैल झालं- खांद्यावरुन उतरतं आहे? फक्त १ मिनिटांत करा परफेक्ट फिटिंग, बघा सोपी ट्रिक
दोन रोपांमध्ये योग्य ती जागा ठेवा. गुलाब जर कुंडीमध्ये लावणार असाल तर त्यांची चांगली वाढ होण्यासाठी आकाराने थोडी मोठी कुंडी निवडा. कारण गुलाबाची रोपे खोल जातात.
३. खत आणि पाणीगुलाबाच्या रोपाला ३ ते ४ महिन्यातून एकदा खत टाकले तरी पुरेसं आहे. शिवाय गुलाबाला खूप जास्त पाणी घालण्याची गरज नसते.
कुंडीतली माती ओलसर राहील याची मात्र सतत काळजी घ्यावी. कारण जेवढं पाणी आणि खत चांगलं मिळेल तेवढी फुलं अधिक छान येतील.