Lokmat Sakhi >Gardening > हिरवीगार इनडोअर प्लांट्स अचानक सुकून गेली? ३ गोष्टी, रोपांना येईल मस्त बहर

हिरवीगार इनडोअर प्लांट्स अचानक सुकून गेली? ३ गोष्टी, रोपांना येईल मस्त बहर

gardening tips for taking care of indoor plants : ऑफीसमध्ये काम करुन घरी आल्यावर या हिरव्यागार रोपांकडे पाहून छान प्रसन्न वाटते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2024 09:48 AM2024-10-01T09:48:02+5:302024-10-01T09:50:01+5:30

gardening tips for taking care of indoor plants : ऑफीसमध्ये काम करुन घरी आल्यावर या हिरव्यागार रोपांकडे पाहून छान प्रसन्न वाटते.

gardening tips for taking care of indoor plants : Lush indoor plants suddenly withered? 3 things, the plants will bloom beautifully | हिरवीगार इनडोअर प्लांट्स अचानक सुकून गेली? ३ गोष्टी, रोपांना येईल मस्त बहर

हिरवीगार इनडोअर प्लांट्स अचानक सुकून गेली? ३ गोष्टी, रोपांना येईल मस्त बहर

पूर्वी घर सजवण्यासाठी शो पिस, फ्रेम्स या गोष्टींचा वापर होत होता. पण गेल्या काही वर्षांपासून इनडोअर प्लांटस घर सजवण्यासाठी वापरण्याचा नवा ट्रेंड आला आहे. प्रत्येक रुममध्ये त्या रुमला साजेल असे डिझायनर पॉट ठेवणे आणि त्यामध्ये मस्त रंगबिरंगी रोपं लावणे याला अनेक जण प्राधान्य देताना दिसतात. यामुळे घरात प्रसन्न आणि फ्रेश तर वाटतेच पण रोपांमुळे ऑक्सिजनची पातळीही चांगली राहण्यास मदत होते. सध्या बाजारात त्यासाठी बरेच पर्याय असून ही रोपं लावण्यासाठी चिनी मातीच्या, काचेच्या, प्लास्टीकच्या किंवा नेहमीच्या मातीच्या कुंड्यांमध्ये बरेच पर्यायही उपलब्ध असतात (gardening tips for taking care of indoor plants). 

दुपारच्या वेळी भर ऊन्हातून आल्यावर किंवा दिवसभर ऑफीसमध्ये काम करुन घरी आल्यावर या हिरव्यागार रोपांकडे पाहून छान प्रसन्न वाटते. आपण हौसेने आणि आवडीने ही रोपं आणतो खरी पण काही दिवसांतच ती कोमेजून जातात. तुमचीही रोपं अशीच कोमेजून गेली असतील तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. या रोपांची काळजी घेताना नेमकं कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे समजून घेऊया... 

१. सूर्यप्रकाश 

इनडोअर प्लांट म्हटले की ते घरात ठेवायचे असतात. त्यामुळे त्यांना अजिबात सूर्यप्रकाशाची गरज नसते असे आपल्याला वाटू शकते. पण प्रत्यक्षात काही रोपांच्या बाबतीत तसे नसते. तर सावलीत मात्र तरीही थोडा प्रकाश मिळेल अशा ठिकाणी ही रोपं ठेवली तरच ती तग धरतात. त्यामुळे आपण ही रोपं एकदम अंधारात ठेवली तर ती कोमेजून जातात. त्यामुळे इनडोअर असली तरीही ही रोपं खिडकीच्या जवळ थोडा प्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवायला हवीत. त्यामुळे ती ताजी - टवटवीत राहतात.

२. पाण्याचे प्रमाण

इनडोअर प्लांट म्हंटल्यावर त्याला पाणी कमी लागते असा आपला समज असतो. तो काही प्रमाणात बरोबरही असतो. पण या रोपांना एक दिवस आड पुरेसे पाणी देणे आवश्यक असते. नाहीतर त्यांची पाने, फांद्या सुकतात आणि या रोपांचा त्राण गेल्यासारखे दिसते. पावसाळ्याच्या दिवसांत मातीमध्ये ओलावा टिकत असल्याने थोडे कमी पाणी चालू शकते. पण थंडी आणि उन्हाळ्यात मात्र या रोपांना व्यवस्थित पाणी द्यायला हवे.

(Image : Google)
(Image : Google)

३. पुरेशी माहिती

बरेचदा आपण बाजारातून एखादे रोप आवडले म्हणून घेऊन येतो. पण त्या रोपाला लागणारे तापमान, पाण्याची, हवेची आवश्यकता याबाबत आपण पुरेशी माहिती घेतोच असे नाही. मग एकाएकी ते रोप कोमेजयला लागते आणि आपल्याला चिंता वाटायला लागते. असे होऊ नये यासाठी रोप घेतानाच त्याबाबत पुरेशी माहिती घ्यायला हवी. ते झाले नाही तर किमान ऑनलाईन तरी माहिती शोधायला हवी.
 

Web Title: gardening tips for taking care of indoor plants : Lush indoor plants suddenly withered? 3 things, the plants will bloom beautifully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.